---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार! टाॅम लॅथमनं रचला इतिहास, किवी संघासाठी अशी कामगिरी करणारा प्रथमच

---Advertisement---

आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंड हा नेहमीच असा संघ मानला जातो जो कोणताही विरोधी संघ कोणत्याही परिस्थितीत हलक्यात घेण्याची चूक करू शकत नाही. किवी संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या त्यांच्या पहिल्या सामन्यात असेच काहीसे केले, जिथे त्यांनी कराचीतील नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात यजमान पाकिस्तानचा एकतर्फी 60 धावांनी पराभव केल. तसेच पॉइंट टेबलमध्ये आपले खातेही उघडले. या सामन्यात किवी संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या टॉम लॅथमने फलंदाजीत महत्त्वाची भूमिका बजावली. ज्यामध्ये त्याच्या बॅटमधून एक शानदार शतकी खेळी दिसून आली. सामन्यानंतर, लॅथमला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा किताबही मिळाला आणि यासोबतच तो एका खास यादीचा भाग बनला.

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टॉम लॅथमने 104 चेंडूंचा सामना करत 118 धावांची शानदार नाबाद शतकी खेळी केली. ज्यामध्ये 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. या सामन्यात त्याने यष्टीरक्षक म्हणून एक झेलही घेतला. सामन्यानंतर लॅथमला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीराचा किताबही देण्यात आला. यासह, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून हा पुरस्कार मिळवणारा लॅथम आता चौथा खेळाडू बनला आहे. याआधी या यादीत अ‍ॅलेक स्टीवर्ट, कुमार संगकारा आणि सरफराज अहमद यांची नावे समाविष्ट होती.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सामनावीराचा किताब जिंकणारे यष्टीरक्षक फलंदाज

अ‍ॅलेक स्टीवर्ट – विरुद्ध बांग्लादेश (2000, नैरोबी)
कुमार संगकारा – विरुद्ध इंग्लंड (2013, द ओव्हल)
सरफराज अहमद – विरुद्ध श्रीलंका (2017, कार्डिफ)
टॉम लॅथम – विरुद्ध पाकिस्तान (2025, कराची)

2000 मध्ये पहिल्यांदाच झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानविरुद्धचा त्यांचा अपराजित विक्रम कायम ठेवला होता आणि या स्पर्धेत दोन्ही संघांमधील हा चौथा सामना होता ज्यामध्ये त्यांनी त्यांना चौथ्यांदा पराभूत केले. किवी संघाला आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांचा पुढचा सामना 24 फेब्रुवारी रोजी बांग्लादेश संघाविरुद्ध खेळायचा आहे. ज्यामध्ये जर त्यांनी विजय मिळवला तर ते उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळजवळ निश्चित करतील.

हेही वाचा-

NZ vs PAK; न्यूझीलंडकडून पराभवानंतर कर्णधार रिझवान संतापला, म्हणाला “संथ फलंदाजी…..
वीजेसारखा झेल! किवी खेळाडूने घेतला अप्रतिम कैच, मोहम्मद रिझवानच्या बत्या गुल.! VIDEO
Champions Trophy; गट ‘अ’ मधील कडव्या स्पर्धेत पाकिस्तानच्या आशा मावळणार?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---