भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यातील सामनावीर वरुण चक्रवर्तीने आपल्या यशाचा रहस्य सांगितला आहे. तो म्हणाला की, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची पातळी आयपीएलच्या बरोबरीची आहे. क्रिकेटपटूंनी टी20 स्वरूपात त्यांचा खेळ सुधारण्यासाठी अधिक स्थानिक स्पर्धा खेळल्या पाहिजेत. कोलकाता येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात चक्रवर्तीने तीन विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले होते. दुसऱ्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “घरगुती क्रिकेटचा स्तर खूप उच्च आहे. मी म्हणेन की आयपीएल किंवा इतर आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बरोबरीचे हे सामने आहेत. मी सर्वांना सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी खेळण्याचा सल्ला देईन.
तो म्हणाला, “मला सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळणे खूप कठीण वाटते. ही स्पर्धा खेळल्याने माझ्या कामगिरीत सुधारणा झाली आहे.” चक्रवर्तीने या हंगामात विजय हजारे ट्रॉफीमध्ये 18 विकेट्स घेतल्या आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सात सामन्यांमध्ये नऊ विकेट्स घेतल्या.
टी20 क्रिकेटच्या तयारीबद्दल बोलताना तो म्हणाला, “सर्वप्रथम मी फलंदाजांचे व्हिडिओ पाहतो, की ते सुरुवातीला कसे शॉट्स खेळतात आणि नंतर कसे खेळतात. ज्यात तो कोणते नवीन शॉट्स खेळत आहे का? अव्हानातम्क खेळपट्टीवर कोणते शाॅट्स चालतात कोणते चालत नाही, अश्या सर्व गोष्टींचा मी विश्लेषण करतो.”
पुढे बोलताना तो म्हणाला, “2021 मध्ये जेव्हा मला वगळण्यात आले तेव्हा मला माझ्या खेळाच्या मानसिक पैलू आणि तंत्रावर काम करण्याची खूप संधी मिळाली. मी माझ्या गोलंदाजीत बरेच बदल केले. आता, मला प्रत्येक संधीचा पुरेपूर फायदा घ्यायचा आहे.”
हेही वाचा-
IND VS ENG; संघ निवडीत मोठी चूक! दुखापतग्रस्त अभिषेक शर्माचा पर्याय भारताकडे नाही
चेन्नईच्या चेपाॅकवर कोणाची जादू, फलंदाज की गोलंदाज? सामन्यापूर्वी जाणून घ्या पिच रिपोर्ट
IND vs ENG: मोक्याच्या क्षणी हा खेळाडू दुखापती, टीम इंडियाला मोठा धक्का.!