---Advertisement---

WMPL 2025: सोलापूर स्मॅशर्सचा दमदार स्क्वॉड जाहीर, ‘या’ आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा समावेश

On: बुधवार, मे 21, 2025 5:59 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन (MCA) तर्फे आयोजित करण्यात आलेल्या वुमेन्स महाराष्ट्र प्रीमियर लीग (WMPL) या महिलांच्या टी-20 फ्रेंचायझी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या हंगामाला यंदा गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर (MCA) भव्य प्रारंभ होणार आहे. एमसीए अध्यक्ष आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील महिलांना भक्कम क्रिकेटिंग व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा यंदा पहिल्यांदाच खेळवली जात आहे. Women’s Maharashtra Premier League 2025

या लीगची सुरुवात 5 जून पासून होणार आहे. यामध्ये एकूण 12 लीग सामने खेळवले जाणार आहेत. तर अंतिम सामना 14 जून रोजी होईल.

डब्लूएमपीएल 2025मध्ये पुणे वॉरियर्स, रत्नागिरी जेट्स, सोलापूर स्मॅशर्स आणि रायगड रॉयल्स हे संघ सहभागी होणार आहेत. WMPL 2025 teams

या स्पर्धेत 4 फ्रेंचायझी संघांचा समावेश आहे, सोलापूर, पुणे, रत्नागिरी , रायगड यांसारख्या प्रमुख शहरांचे प्रतिनिधित्व असलेले संघ मैदानात उतरणार आहेत. सोलापूर स्मॅशर्स या संघात भारताची आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू तेजल हसबनीस कर्णधार म्हणून जबाबदारी सांभाळणार आहे. तेजल भारताकडून 6 वनडे खेळली असून तीची जुन महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ईश्वरी अवसरे ही अंडर 19 विश्वचषक 2025 विजेत्या भारतीय संघाची भाग होती. ती देखील या संघात आहे.

डब्लूएमपीएल 2025 साठी सोलापूर स्मॅशर्सचा संघ- ईश्वरी अवसरे, तेजल हसबनीस (कर्णधार), साक्षी वाघमोडे, मयुरी थोरात, ईश्वरी सावकार, आस्मी कुलकर्णी, दामिनी बंकर, आरती केदार, गायत्री सुरवसे, समुद्धी बनवणे, स्वांजली मुळे, शरयु कुलकर्णी, निकीता सिंग, एकता नंगुडे, मुक्ता मगरे, शालमली क्षत्रिय, सानिका पाटील, नव्या दुबे, क्रिशी ठक्कर, आंचल आग्रवाल (WMPL 2025: Full Squad of Solapur Smashers team)

या स्पर्धेच्या घोषणेवेळी MCA अध्यक्ष आ. रोहित पवार यांनी सांगितले की, “WMPL मुळे राज्यातील ग्रामीण भागातील प्रतिभावान महिला खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर पोहोचण्याचा मार्ग खुला झाला आहे. ही स्पर्धा केवळ टी-20 क्रिकेटपुरती मर्यादित नसून, महिला क्रिकेटचा पाया मजबूत करण्यासाठीची एक ठोस पावले आहे.”

चाहत्यांनी स्टेडियमवर येऊन सामने पहावेत
या स्पर्धेतील सर्व सामने पुण्यातील गहुंजे येथील एमसीए इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. एमसीएचे अध्यक्ष आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, सर्व प्रेक्षकांना स्टेडियममध्ये मोफत प्रवेश मिळेल. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून आपल्या आवडत्या संघांना व खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे. (Maharashtra Premier League 2025: Free Stadium Entry, Grand Drone Show at Opening Ceremony)

थेट हातातील मोबाईलवर पाहता येणार सामने
हे सर्व सामने JioCinema (JioHotstar) या OTT प्लॅटफॉर्मवर आणि Star Sports 2 या टीव्ही वाहिनीवर थेट प्रक्षेपित केले जातील. त्यामुळे प्रेक्षकांना घरबसल्या देखील ही रोमांचक स्पर्धा पाहण्याची संधी मिळणार आहे. (Where to Watch MPL 2025: Live on Star Sports 2 and JioCinema)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---