---Advertisement---

WPL: दिल्ली कॅपिटल्सचा थेट अंतिम फेरीत दिमाखदार प्रवेश, आरसीबीचे स्वप्न भंग!

---Advertisement---

महिला प्रीमियर लीग (WPL) 2025चा लीग टप्पा संपला आहे. मेग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स (DC) ने सलग तिसऱ्यांदा थेट डब्ल्यूपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवून डीसीने अंतिम फेरीत प्रवेश केला, जो की 15 मार्च रोजी खेळला जाईल. दिल्लीने आठ पैकी पाच सामने जिंकले ज्यात 10 गुण मिळवले. तीन सामन्यांमध्ये संघ पराभूत झाला. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्स (MI) चेही 10 गुण आहेत पण संघ दुसऱ्या स्थानावर राहिले. खरं तर, डीसीचा नेट रन रेट मुंबई (+0.192) पेक्षा थोडा चांगला आहे.

प्लेऑफमधून आधीच बाहेर पडलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) ने मुंबईसाठी ‘शेवटचा काटा’ काढला. मंगळवारी तिसऱ्या हंगामातील शेवटचा लीग सामना म्हणजेच 20वा सामना मुंबई आणि आरसीबी यांच्यात खेळला गेला. ब्रेबॉर्न स्टेडियमवर आरसीबीने एमआयचा 11 धावांनी पराभव केला. जर एमआयने हा सामना जिंकला असता तर ते थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरले असते. आता 13 मार्च रोजी होणाऱ्या एलिमिनेटर सामन्यात मुंबईचा सामना गुजरात जायंट्स (GT) शी होईल. एलिमिनेटरमध्ये जो संघ जिंकेल तो अंतिम फेरीत दिल्लीशी सामना करेल. आरसीबीने गुणतालिकेत चौथे स्थान पटकावले आणि यूपी वॉरियर्सने पाचवे स्थान पटकावले. दोघांनीही प्रत्येकी तीन सामने जिंकले आणि 6 गुण मिळवले. गेल्या वर्षी आरसीबीने डब्ल्यूपीएल ट्रॉफी जिंकली होती.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 3 गडी गमावून 199 धावा केल्या. स्मृती मानधना (53), एलिस पेरी (49*), आणि जॉर्जिया वेअरहॅम (31* धावा, 10 चेंडूत) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. मुंबईकडून हेली मॅथ्यूजने 2 बळी घेतले.

मुंबईने 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना नॅट स्किव्हर ब्रंटच्या 69 धावांमुळे लढत दिली, पण स्नेह राणा (3/26), किम गार्थ (2/33), आणि एलिस पेरी (2/53) यांच्या प्रभावी गोलंदाजीसमोर 9 गडी बाद 188 धावाच करू शकले. आशाप्रकारे आरसीबीने 11 धावांनी विजय मिळवला.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---