---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेचे न्यूझीलंडसमोर तिसऱ्याच दिवशी लोटांगण! एक डाव २७६ धावांनी मिळवला दणदणीत विजय

On: शनिवार, फेब्रुवारी 19, 2022 7:24 AM
---Advertisement---

ख्राईस्टचर्च- दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड (South Africa Tour Of New Zealand) दौऱ्यावर आहे. या दौऱ्याची सुरुवात कसोटी मालिकेने झाली. मात्र, मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान न्यूझीलंडने पाहुण्या संघाचा (NZvSA) दारुण पराभव केला. कसोटीच्या अवघ्या तिसऱ्या दिवशीच दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंड समोर लोटांगण घातले. न्यूझीलंडने या पहिल्या सामन्यात एक डाव व २७६ धावांनी मोठा विजय साजरा केला. दोन्ही डावात भेदक गोलंदाजी करणाऱ्य मॅट हेन्री (Matt Henry) याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

 

पहिल्या डावात हेन्रीची भेदक गोलंदाजी

भारतीय संघाविरुद्ध मायदेशात कसोटी मालिका विजय साजरा केलेल्या दक्षिण आफ्रिका संघासाठी या दौऱ्याची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. ख्राईस्टचर्च कसोटीच्या पहिल्या दिवशीच मॅट हेन्रीच्या ७ बळींच्या जोरावर न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ९५ धावांवर गुंडाळत चांगली सुरुवात केली होती.

त्यानंतर यजमान संघाने आपल्या पहिल्या डावात शानदार फलंदाजीचा नजराना दाखवला. ‌ मधल्या फळीतील फलंदाज हेन्री निकोल्सने अप्रतिम शतकी खेळी केली. तर टॉम ब्लंडल हा शतकापासून वंचित राहिला. तो दुर्दैवाने ९६ धावांवर तंबूत परतला. तरीही न्यूझीलंडने पहिल्या डावात तब्बल ४८२ धावा करत ३८७ धावांची मोठी आघाडी मिळवली.

दक्षिण आफ्रिका संघ दुसऱ्या डावातही कमाल करू शकला नाही. अनुभवी टीम साऊदीच्या ५ बळींमुळे त्यांचा दुसरा डावही अवघ्या १११ धावांवर गडगडला. यासह न्यूझीलंडने दोन सामन्यांच्या मालिकेतील हा पहिला सामना १ डाव व २७६ धावांनी खिशात घातला. संपूर्ण सामन्यात मिळून ९ बळी मिळवणाऱ्या मॅट हेन्रीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. मालिकेतील दुसरा व अंतिम सामना २५ फेब्रुवारीपासून याच मैदानावर खेळला जाईल.

महत्वाच्या बातम्या-

अय्यरचा चेंडू भारताच्या डगआऊटमध्ये, खेळाडू जागचे उठून पळाले इकडे-तिकडे; बघा मजेशीर Video (mahasports.in)

जखमी असूनही एका फोन कॉलवर विराट पोहोचला होता सिराजच्या घरी, गोलंदाजाकडून भावुक किस्स्याला उजाळा (mahasports.in)

आयपीएलमध्ये दुर्लक्षित राहिलेल्या श्रीसंतचे ९ वर्षांनंतर प्रथम श्रेणीत कमबॅक, पहिल्याच सामन्यात केली कमाल (mahasports.in)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---