आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांना १७ ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून सुपर-१२ सामन्यांना सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्वच संघ कसून सराव करताना दिसून येत आहे. दरम्यान स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच न्यूझीलंड संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर येत आहे.
न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विलियमसन हा सुरुवातीचे काही सामने खेळण्यावर शंका व्यक्त केली जात आहे. न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टिड यांनी खुलासा केला आहे की, कोपरच्या दुखापतीमुळे तो सुरुवातीचे काही सामने गमावू शकतो. ज्यामुळे न्यूझीलंड संघाला मोठा धक्का बसू शकतो.
न्यूझीलंड संघाला इंग्लंड संघाने दुसऱ्या सराव सामन्यात १३ धावांनी पराभूत केले होते. त्यावेळी केन विलियमसन क्षेत्ररक्षण करताना दिसून आला होता. परंतु तो फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आला नव्हता. गॅरी स्टिड यांनी खुलासा करत म्हटले की, “पहिल्या सराव सामन्यानंतर केन विलियमसनच्या दुखापतीत वाढ झाली आहे. त्या सामन्यात केन विलियमसनने ३० चेंडूंमध्ये ३७ धावांची खेळी केली होती.” परंतु न्यूझीलंड संघाला ३ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला होता.
तसेच ते पुढे म्हणाले की, “केन विलियमसन आक्रमक फलंदाजांपैकी एक आहे आणि तो सराव देखील तसाच करत असतो. परंतु अनेकदा मोठे नुकसान होत असते. आम्ही संतुलन टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहोत, त्यामुळे आम्हाला आमची चिंता वाढवायची नाहीये.”
न्यूझीलंड संघाला पहिला सराव सामना मंगळवारी (२६ ऑक्टोबर) पाकिस्तान संघाविरुद्ध खेळायचा आहे. त्यानंतर ३१ ऑक्टोबर रोजी भारतीय संघाविरुद्ध, ५ नोव्हेंबर रोजी पात्रता फेरीतील विजेत्या संघासोबत आणि ७ नोव्हेंबर रोजी अफगानिस्तान संघाविरुद्ध न्यूझीलंड संघाचा सामना होणार आहे. न्यूझीलंड संघाला ७ दिवसाच्या आत सर्व सामने खेळायचे आहेत, ज्यामुळे त्यांना विश्रांती मिळण्याची शक्यता खूप कमी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पीएनजीविरुद्ध ३ धावांनी शाकिबचे अर्धशतक हुकले, पण टी२० विश्वचषकातील ‘या’ विक्रमांत रोहितला पछाडले
स्कॉटलंडची भरारी! ओमानला पराभूत करत साधली विजयाची हॅट्रिक; सुपर १२ मध्येही मिळवले स्थान
विराटची गोलंदाजी अन् स्मिथची बॅटिंग! ११ वर्षांनी सराव सामन्यादरम्यान घडला खास योगायोग