आयपीएल २०२१ स्पर्धेत सनरायझर्स हैदराबाद संघाचे नेतृत्व करणारा केन विलियम्सन शेवटच्या सामन्यापूर्वी दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे मुंबई इंडियन्स संघाविरुद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात त्याला खेळता आले नव्हते. दरम्यान, टी२० विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दुखापतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
येत्या १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेत न्यूझीलंड संघाची पहिली लढत पाकिस्तान संघाविरुद्ध होणार आहे. या सामन्यात केन विलियम्सन खेळणार की नाही? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. आता याबाबत न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी मोठा खुलासा केला आहे. ज्यामुळे न्यूझीलंड संघाच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
स्टीड यांनी न्यूझीलंड क्रिकेटला म्हटले की, “विलियमसन आता ठीक आहे. त्याला हॅमस्ट्रिंगचा त्रास झाला होता. परंतु, तो यातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहे. हैदराबाद संघ देखील आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाला आहे.”
तसेच ते पुढे म्हणाले की, “आम्ही आज उष्ण वातावरणात सराव केला आहे. आम्ही २ वाजता सराव सुरू केला होता. त्यावेळी तापमान ३५ ते ३८ डिग्री इतके होते. असे वाटत होते की, कोणीतरी आग लावत आहे.”
डेविड वॉर्नरला कर्णधार पदावरून काढून सनरायझर्स हैदराबाद संघाचे कर्णधारपद केन विलियमसनकडे देण्यात आले होते. परंतु, या संघाला आयपीएल २०२१ स्पर्धेत साजेशी कामगिरी करता आली नाही. शेवटच्या सामन्यात देखील मुंबई इंडियन्स संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला ४२ धावांनी पराभूत केले होते.
केन विलियमसन आयपीएल स्पर्धेतून बाहेर झाल्यानंतर ६ दिवस क्वारंटाईन होता. त्यानंतर टी२० विश्वचषकासाठी तो आता दुबईला पोहोचला आहे. त्याच्यासह जिमी निशम, एडम मिल्ने आणि शेन बॉन्ड हे न्यूझीलंड संघाचे सदस्य देखील दुबईला पोहोचले आहे. शेन बॉन्ड न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणार आहे.
असा आहे आगामी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, मार्क चॅपमन, जिमी नीशम, टॉम एश्ले, डारयल मिचेल, मिचेल सॅंटनर, डेवोन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्यूसन, काईल जेमीसन, ईश सोढी, टिम साउथी.
महत्त्वाच्या बातम्या –
तेरा यार हूं मै! अय्यर-आवेशचे बंधूप्रेम; फोटो होतोय व्हायरल
विश्वचषक की आयपीएल फायनल? केकेआरच्या ‘या’ दिग्गज खेळाडूच्या खेळण्याबाबत बोर्ड घेणार निर्णय
जगावेगळा निर्णय; वेगाचा बादशहा शेन बॉन्ड देतोय फिरकीपटूंना धडे; ‘हे’ आहे कारण




