---Advertisement---

ग्रँडहोमबाबत न्यूझीलंडने केलेल्या ‘त्या’ पोस्टने चाहत्यांचा गोंधळ, ‘आत्म्यास शांती लाभो’ सारख्या येऊ लागल्या प्रतिक्रिया

On: बुधवार, सप्टेंबर 15, 2021 3:05 PM
---Advertisement---

सोशल मीडिया आता सर्वांच्याच आयुष्यातील एक महत्वाचा भाग झाला आहे. अनेकजण विविध गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असतात. या दरम्यान खऱ्या आणि खोट्या गोष्टी देखील वाऱ्याच्या वेगाने जगभरात पसरत असतात. त्यामुळे कुठली गोष्ट खरी आणि कुठली गोष्ट खोटी हे कळून येत नाही. ज्यामुळे समज आणि गैरसमज निर्माण होत असतात. असाच काहीसा प्रकार न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन ग्रँडहोमच्या बाबतीत देखील झाला आहे.

न्यूझीलंड क्रिकेट संघाचे अधिकृत सोशल मीडिया अकाऊंट सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ते सोशल मीडियाद्वारे खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीचे कौतुक करत असतात. तसेच मजेशीर ट्विट देखील करत असतात. नुकताच त्यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक मजेशीर ट्विट केले आहे. ज्यावर चाहते देखील भन्नाट प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.

न्यूझीलंड संघाचा अष्टपैलू खेळाडू कॉलिन ग्रँडहोम हा आपल्या वेगवान गोलंदाजी आणि तुफान फलंदाजीसह हटके हेअर स्टाइलसाठी देखील प्रसिद्ध आहे. परंतु, तो नवीन लूकमध्ये दिसून येणार आहे. यापूर्वी मोठे केस ठेवणाऱ्या कॉलिन ग्रँडहोमने आपले केस काढून टाकले आहे. त्याची माहिती न्यूझीलंड संघाच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर देण्यात आली आहे.

त्यांनी छोटे केस केलेल्या कॉलिन ग्रँडहोमचा फोटो शेअर करत लिहिले की,”ब्रेकिंग न्यूज.. प्रसिद्ध कॉलिन ग्रँडहोम मलेट (ग्रँडहोमचे मोठे केस) आता नाही राहिले.” हे ट्विट पाहून, नेटकऱ्यांना असे वाटू लागले आहे की, कॉलिन ग्रँडहोम या जगात राहिला नाही. त्यामुळे चाहते या फोटोच्या खाली भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत.

या फोटोच्या खाली एका युजरने ट्विट करत लिहिले की, “कॉलिन ग्रँडहोमच्या आत्म्यास शांती लाभो.” तर दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “कधी वाटले नव्हते की तो इतक्या लवकर सोडून जाईल!! तो न्यूझीलंड संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये एक अप्रतिम अष्टपैलू खेळाडू होता..मिस यू लेजेंड.” तर आणखी एका युजरने की,”आयुष्याचा काही भरवसा नाही.”

खरंतर हे ट्विट न्यूझीलंडने ग्रँडहोमने त्याचे मोठे केस काढून टाकल्याबद्दल केले होते. ज्यांच्या हे लक्षात आले त्यांनी काही मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत.

https://twitter.com/emma_cuth/status/1437818453273026567

कॉलिन ग्रँडहोमने न्यूझीलंड संघासाठी ४१ टी -२०, ४२ वनडे आणि २६ कसोटी सामने खेळले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या – 

नाद निनादला रे मोरया! ‘ट्रिपल महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरींनी बाप्पाच्या मुर्तीसमोर धरला ठेका, पाहा व्हिडिओ

अवघड आहे! करोडपती मलिंगा गेल्या दहा वर्षात भेटला नाही जन्मदात्या आई-बापाला

सीपीएलमध्ये दुखापतग्रस्त झालेल्या सीएसके संघातील स्टार खेळाडूच्या फिटनेसबाबत मोठी अपडेट आली समोर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---