न्यूझीलंडचा क्रिकेटपटू डॅरिल मिचेल (Daryl Mitchell) याला आयसीसीने २०२१ आयसीसी स्पिरिट ऑफ क्रिकेट पुरस्काराने (ICC Spirit Of Cricket Award 2021) सन्मानित केले आहे. २०२१ च्या टी२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखविलेल्या खिलाडूवृत्तीसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. उपांत्य फेरीत न्यूझीलंडचा सामना इंग्लंडशी झाला. हा सामना अबुधाबीमध्ये खेळला गेला. डॅरिल मिशेल हा पुरस्कार जिंकणारा न्यूझीलंडचा चौथा खेळाडू आहे. त्याच्या आधी डॅनियल व्हिटोरी, ब्रेंडन मॅक्युलम आणि केन विलियम्सन यांनी आयसीसीचा हा विशेष सन्मान पटकावला आहे.
मागील वर्षी १० नोव्हेंबर २०२१ रोजी अबूधाबी येथे खेळल्या गेलेल्या टी२० विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य सामन्यात मिशेलने इंग्लंडविरुद्ध एकेरी धाव घेण्यास नकार दिला होता. त्याच्या याच खेळाचा मान राखत आयसीसीने त्याला स्पिरिट ऑफ क्रिकेट या सन्मानाने सन्मानित केले. (T20 World Cup 2021)
https://www.instagram.com/p/CZeE51sMaTT/?utm_medium=copy_link
न्यूझीलंडच्या या स्टार अष्टपैलू खेळाडूने आयसीसीने सन्मानित केल्याबद्दल स्वतःला भाग्यवान मानले. हा पुरस्कार मिळाल्याने मला खूप आनंद होत असल्याचे त्याने सांगितले. “माझ्यासाठी हा सन्मान आहे. युएईमध्ये टी२० विश्वचषक खेळणे हा एक अद्भुत अनुभव होता. हा पुरस्कार मिळाल्यानंतर आनंद वाटत आहे. न्यूझीलंडचा एक खेळाडू असल्याचा मला अभिमान वाटतो. आम्हाला उपांत्य फेरीचा सामना आमच्याच हिमतीवर जिंकायचा होता. एवढ्या मोठ्या स्पर्धेत आम्हाला कोणताही वाद निर्माण करायचा नव्हता. त्यामुळे मला जे योग्य वाटले ते मी केले.”
अशी घडली होती घटना
या सामन्यात न्यूझीलंड संघाची फलंदाजी सुरू असताना आदिल राशिद १७ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी जिमी निशाम फलंदाजी करत होता. तर डॅरिल मिचेल नॉन स्ट्राइकवर होता. षटकातील पहिल्या चेंडूवर निशामने सरळ फटका मारला. त्यावेळी दोन्ही फलंदाज धाव घेण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, गोलंदाजी करत असलेला आदिल राशिद मध्ये आला होता. धाव घेण्याच्या प्रयत्नात आदिल राशिद आणि मिचेल यांच्यात धडक झाली होती. त्यावेळी मिचेल याने धाव घेण्यास नकार दिला होता. ही घटना घडल्यानंतर गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये वाद होऊ शकला असता. परंतु, मिचेलने भावना दाखवली आणि त्याला निशामने देखील साथ दिली. (Daryl Mitchell Sportsmanship Spirit)
महत्वाच्या बातम्या-
गौरवास्पद! क्रीडाविश्वातील सर्वोच्च जागतिक पुरस्कारासाठी ‘गोल्डन बॉय’ नीरजला नामांकन (mahasports.in)
एकेकाळी आयपीएल गाजवणाऱ्या ‘या’ सात भारतीयांवर मेगा लिलावात बसू शकतो ‘अनसोल्ड’ शिक्का (mahasports.in)