आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (9 नोव्हेंबर) महत्वाचा सामना पार पडला. विश्वचषक स्पर्धेतील 41व्या सामन्यात श्रीलंकेला न्यूझीलंडने 5 विकेट्स राखून धूळ चारली. सोबतच या विजयाच्या जोरावर न्यूझीलंडने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जागा जवळपास पक्की केली आहे. यासोबतच त्यांनी वनडे विश्वचषक स्पर्धेतील आपली सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखली.
चिन्नास्वामी स्टेडियम येथे झालेल्या या सामन्यात श्रीलंका संघाने प्रथम फलंदाजी करताना केवळ 171 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने आक्रमक फलंदाजी करत केवळ 23.2 षटकात हे आव्हान पार केले. त्यामुळे विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील त्यांचे स्थान जवळजवळ निश्चित झाले आहेत. न्यूझीलंडला मागे टाकून पाकिस्तानला या सेमी फायनलमध्ये जागा मिळवायची असल्यास, त्यांना इंग्लंडवर तब्बल 287 धावांनी विजय मिळवावा लागणार आहे. तर, धावांचा पाठलाग करताना केवळ 15 चेंडूंमध्ये कोणतेही आव्हान पार करावे लागेल. ही गोष्ट अशक्य नसली तरी, क्रिकेटच्या मैदानावर वारंवार घडत नाही.
याच कारणामुळे न्यूझीलंड संघाची उपांत्य फेरीतील जागा निश्चित मानली जात आहे. त्यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केल्यास सलग पाचव्या वनडे विश्वचषकात ते उपांत्य फेरी खेळतील. न्यूझीलंड संघांनी 2007 मध्ये स्टीफन फ्लेमिंगच्या नेतृत्वात उपांत्य फेरी खेळली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केलेले. त्यानंतर 2011 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत श्रीलंकेने त्यांना मात दिलेली.
यानंतर 2015 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत त्यांनी मजल मारली. मात्र, ऑस्ट्रेलियाने त्यांना पराभूत केले. 2019 विश्वचषकात इंग्लंड विरुद्ध देखील अंतिम फेरीत त्यांना सुपर ओवरमध्ये बाउंड्री काउंटवर पराभूत व्हावे लागलेले. त्यानंतर आता ते सलग पाचव्या विश्वचषकात उपांत्य फेरी खेळतील.
(Newzealand Entered Consecutive Fifth Time In Semi Final Of ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
CWC 2023 । भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार? पाहा काय आहेत समीकरणं
सूर्यकुमारकडे भारताचा कर्णधार बनण्याची संधी, हार्दिक पंड्याबाबत संघ घेणार मोठा निर्णय