---Advertisement---

CWC 2023 । भारत विरुद्ध पाकिस्तान सेमीफायनल होणार? पाहा काय आहेत समीकरणं

Shaheen Afridi (India vs Pakistan)
---Advertisement---

आयसीसी वनडे विश्वचषक 2023 मध्ये गुरुवारी (9 नोव्हेंबर) महत्वाचा सामना पार पडला. विश्वचषक स्पर्धेतील 41व्या सामन्यात श्रीलंकेला न्यूझीलंडने 5 विकेट्स राखून धूळ चारली. सोबतच या विजयाच्या जोरावार न्यूझीलंडने विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात जागा जवळपास पक्की केली. दुसरीकडे पाकिस्तानचे उपांत्य सामन्याचे स्वप्न अपूर्ण राहणार की पूर्ण होणार हा प्रश्न अनेकांना पडला आहे.

उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि त्यानंतर अफगाणिस्तान या तीन संघांमध्ये स्पर्धा होती. पण गुरुवारी (9 नोव्हेंबर) न्यूझीलंडने ही स्पर्धा जवळपास संपवली. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात न्यूझीलंडने अवघ्या 23.2 षटकात 172 धावांचे लक्ष्य गाठले आणि उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के केले. असे असले तरी, पाकिस्तानच्या आशा अद्याप संपल्या नाहीत. पण पाकिस्तानसाठी आता उपांत्य सामन्यात खेळणे खूपच कठीण आहे. पाकिस्तानला आपला पुढचा सामना इंग्लंड संघाविरुद्ध खेळायचा आहे, मोठ्या अंतराने जिंकावा लागेल.

जर इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी केली, तर तब्बल 287 धावांनी विजय मिळवावा लागेल. तसेच प्रथम गोलंदाजी केली, तर 284 चेंडू राखून सामना जिंकावा लागेल. इंग्लंड या विश्वचषक स्पर्धेत सुमार प्रदर्शन करताना दिसला आहे. पण पाकिस्तासोबतच्या सामन्यात एवढा मोठा पराभव इंग्लंड स्वीकारेल, अशी जराही शक्यता वाटत नाही. अशात पाकिस्तान संघासाठी 2023 विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य सामना एक अपूर्ण स्वप्न ठरू शकते. (CWC 2023 । India vs Pakistan semi-final? See what the equations are)

महत्वाच्या बातम्या – 
सचिनच्याही पुढे रचिन! पहिल्याच वर्ल्डकपमध्ये अनेक दिग्गजांचे विक्रम केले उद्ध्वस्त
श्रीलंकेच्या शेपटाने रचला इतिहास! वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणीच न केलेली कामगिरी नावे

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---