संयुक्त अरब अमिराती युएई येथे सुरू असलेल्या टी२० विश्वचषकात बुधवारी (३ नोव्हेंबर) पहिल्या सामन्यात ब गटातील न्यूझीलंड व स्कॉटलंड हे संघ आमनेसामने येतील. या सामन्यात विजय मिळवून उपांत्य फेरीकडे आगेकूच करण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न असेल. दुसरीकडे हा सामना जिंकून सुपर १२ फेरीतील पहिला विजय नोंदविण्याचे आव्हान स्कॉटलंडसमोर असेल. दुबई येथील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार हा सामना दुपारी ३.३० वाजता सुरू होईल.
न्यूझीलंडकडे आगेकूच करण्याची संधी
केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली या विश्वचषकात सहभागी झालेल्या न्यूझीलंड संघाला पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध अटीतटीच्या सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. अखेर षटकांत आसिफ अली व शोएब मलिक यांनी फटकेबाजी करत पाकिस्तानला विजय मिळवून दिलेला. त्यानंतर, न्यूझीलंडने भारतीय संघाला ८ धावांनी लोळवत गुणांचे खाते उघडले. सध्या न्यूझीलंड गुणतालिकेत दुसऱ्या व स्कॉटलंड सहाव्या क्रमांकावर आहे.
पुढील सामने महत्त्वपूर्ण
बुधवारी स्कॉटलंडविरूद्ध होणारा सामना व त्यानंतर नामिबिया विरुद्धचा सामना मोठ्या फरकाने जिंकत आपला नेट रनरेट वाढविण्यासाठी न्यूझीलंड प्रयत्न करेल. त्यांचा अखेरचा साखळी सामना अफगाणिस्तान विरूद्ध होईल. हा सामना निश्चितच सोपा नसेल, त्यामूळे या सामन्यात पराभव झाला तरी, चांगल्या रनरेटमूळे न्यूझीलंडचा फायदा होऊ शकतो. ब गटातील उपांत्य फेरीचा दुसरा संघ हा अफगाणिस्तान व न्यूझीलंड यापैकी असू शकतो. भारताला उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची अत्यंत कमी संधी राहिल.
स्कॉटलंडविरूद्ध न्यूझीलंडचा संभाव्य संघ-
मार्टिन गप्टिल, डेरिल मिचेल, केन विलियम्सन (कर्णधार), डेवॉन कॉनवे, ग्लेन फिलीप्स, मिचेल सॅंटनर, जिमी निशाम, ट्रेंट बोल्ट, टीम साऊदी, ऍडम मिल्ने व ईश सोढी.
न्यूझीलंडविरुद्ध स्कॉटलंडचा संभाव्य संघ-
कायले कोएत्झर (कर्णधार), जॉर्ज मॅन्सी, रिची बॅरिंग्टन, मॅथ्यू क्रॉस, मायकल लिस्क, एलेस्डर इवान्स, डायलन बज, ख्रिस ग्रीव, जोश डेवि, मार्क वॅट व साफियान शरीफ.
महत्त्वाच्या बातम्या-
ओ लडका आँख मारे! कर्णधार आझमला बाद केल्यानंतर गोलंदाजाने मारला डोळा, पाहा मजेशीर व्हिडिओ
निवृत्ती घेतलेल्या असगर अफगानच्या जागी ‘या’ खेळाडूची लागली वर्णी, भारतीय संघाला देणार टक्कर
ओ लडका आँख मारे! कर्णधार आझमला बाद केल्यानंतर गोलंदाजाने मारला डोळा, पाहा मजेशीर व्हिडिओ