भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना रंगला होता. या सामन्यात भारतीय संघाला विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु न्यूझीलंड संघातील गोलंदाजांनी आणि फालंदाजांनी उत्कृष्ट खेळी करत भारतीय संघाला ८ गडी राखून पराभूत केले. तब्बल १४४ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटला पहिलावहिला विश्वविजेता संघ मिळाला आहे. तसेच न्यूझीलंड संघ जेव्हा गदा घेऊन मायदेशी परतला, तेव्हा त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आले.
न्यूझीलंड संघ मायदेशी परतला असून, त्यांना तिथे १४ दिवस विलगीकरणात राहावे लागणार आहे. अशातच निल वॅग्नरने सांगितले की, मायदेशी परतल्यानंतर विश्वविजेत्या संघाचे कशाप्रकारे स्वागत करण्यात आले? (New Zealand pacer Neil Wagner says police wanted to click photos with WTC mace at airport)
निल वॅग्नरने, स्टफ डॉट को न्यूझीलंडला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “मला नाही वाटत की, यापूर्वी अशाप्रकारच्या चालीरीतीने आमचे स्वागत करण्यात आले असेल. सर्वच लोक खेळाडूंना शुभेच्छा देत होते. त्यांनी आमचे पासपोर्ट घेतले आणि विचारायचा प्रयत्न करत होते की, विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची गदा कुठे आहे? इतकेच नव्हे तर, पोलीस अधिकारीही थांबून फोटो काढण्याच्या प्रयत्नात होते. सर्वांच्या तोंडावर हास्य फुलले होते, जे पाहून मला खूप आनंद झाला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “हे शब्दात सांगणे खूप कठीण आहे. मला अजूनही आमचे हे यश खर आहे, असं वाटत नाही. सर्वकाही सामाजिक भान राखून करण्यात आले होते. आम्ही एकमेकांशी हात देखील मिळवू शकत नव्हतो. आमच्याकडे गदा होती आणि प्रत्येकाला त्या गदासोबत फोटो काढायचा होता. परंतु आम्ही त्यांना गदा देऊ शकत नव्हतो. हे खूप दुःखदायक होते. परंतु कोरोनाच्या नियमांचेही पालन करणे आवश्यक आहे. न्यूझीलंडच्या सर्व क्रिकेट चाहत्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य फुलले होते. सर्व लांबूनच शुभेच्छांचा वर्षाव करत होते. ही आम्हा सर्वांसाठी खूप मोठी गोष्ट होती.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “गदा दोन आठवड्यांसाठी बीजे वॅटलिंगकडे देण्यात आली आहे. त्याने या सामन्यात ५ झेल टिपले होते. तसेच हा त्याचा शेवटचा कसोटी सामना होता. त्याने अंतिम सामन्यापूर्वीच निवृत्ती जाहीर करण्याची घोषणा केली होती.” निल वॅग्नरने या सामन्यातील पहिल्या डावात २ गडी आणि दुसऱ्या डावात १ गडी बाद केला होता.
महत्वाच्या बातम्या-
पराजयानंतर नेतृत्त्वपद सोडा कोहलीला WTC प्लेइंग XIमध्येही मिळाली नाही जागा, पाहा संपूर्ण संघ
यजमानांचाअन् त्या खेळीनंतर केपीला संबोधलं गेलं होतं ‘द मोस्ट कम्प्लिट बॅट्समन इन क्रिकेट’
श्रीलंकेला व्हाईटवॉश, मलानच्या तूफानी खेळीने इंग्लंडचा टी२० मालिकेत ३-०ने विजय