वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41 वा सामना बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर खेळला जातोय. या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघ आमने-सामने आहेत. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र सर्वच गोलंदाजांनी या अति महत्त्वाच्या सामन्यात शानदार गोलंदाजी करत श्रीलंकेचा डाव 171 धावांवर गुंडाळला. या सामन्यात विजय मिळवल्यास न्यूझीलंड संघाचे उपांत्य फेरीतील स्थान जवळपास पक्के होईल.
या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. अखेरच्या सामन्यात श्रीलंका (Sri Lanka) संघ इंग्लंडविरुद्ध मोठे आव्हान उभे करायचे, या हेतूने मैदानात उतरला होता. मात्र, त्यांनी पॉवरप्लेमध्ये म्हणजेच पहिल्या 10 षटकातच 5 विकेट्स गमावल्या. या 5 विकेट्सपैकी 3 विकेट्स ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याने, तर इतर दोन विकेट्स लॉकी फर्ग्युसन आणि टीम साऊदी यांनी घेतल्या.
श्रीलंका संघासाठी सलामीवीर कुसल परेरा याने आक्रमक 51 धावांची खेळी केली. मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही. तळातील फलंदाजांनी थोडाफार संघर्ष करत श्रीलंकेला दीडशे पार पोहोचवले. महिश थिक्षणा व मदुशंका यांनी अखेरच्या गड्यासाठी महत्त्वपूर्ण 43 धावा केल्या. मात्र, अखेरीस त्यांचा डाव 171 धावांवर संपुष्टात आला. न्यूझीलंड संघासाठी ट्रेट बोल्ट याने सर्वाधिक तीन बळी मिळवले.
(Newzealand Restirct Srilanka On 171 In ODI World Cup Match Trent Boult Shines)
हेही वाचा-
दिग्गजांना पछाडत बोल्टने घडवला इतिहास, बनला विश्वचषकात न्यूझीलंडसाठी ‘अशी’ कामगिरी करणारा पहिला गोलंदाज
पीसीबीकडून इंझमाम उल हकचा राजीनामा मंजुर, लावले होते ‘हे’ मोठे आरोप