पहिल्या 5 ओव्हरमध्येच श्रीलंकेला धक्क्यावर धक्के! बोल्टने एकाच ओव्हरमध्ये घेतले 2 बळी

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडिअमवर विश्वचषक 2023 स्पर्धेतील 41वा सामना न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका संघात खेळला जात आहे. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय संघाच्या गोलंदाजांनी अगदी योग्य असल्याचे प्राथमिकरीत्या सिद्ध केले. श्रीलंका संघाची सुरुवात खूपच खराब झाली. विस्फोटक फलंदाजांनी भरलेल्या लंकेला आपले पहिले तीन विकेट्सवर पाणी सोडावे लागले.
कशा पडल्या तीन विकेट्स?
झाले असे की, श्रीलंकेकडून डावाची सुरुवात करण्यासाठी पथुम निसांका (Pathum Nissanka) आणि कुसल परेरा (Kusal Perera) मैदानात उतरले होते. यावेळी डावातील दुसरे षटक टीम साऊदी (Tim Southee) टाकत होता. साऊदीने आपल्या षटकातील पाचव्या चेंडूवर निसांकाला यष्टीरक्षक टॉम लॅथम (Tom Latham) याच्या हातून झेलबाद केले. त्यामुळे निसांकाला 2 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला.
बोल्टचा धमाका
त्यानंतर श्रीलंकेच्या डावातील पाचवे षटक टाकण्याची जबाबदारी ट्रेंट बोल्ट (Trent Boult) याच्या खांद्यावर सोपवण्यात आली. यावेळी बोल्टने षटकातील पहिल्याच चेंडूवर संघाला विकेट मिळवून दिली. त्याने कर्णधार कुसल मेंडिस (Kusal Mendis) याला रचिन रवींद्र (Rachin Ravindra) याच्या हातून झेलबाद केले. यावेळी मेंडिस 7 चेंडूत 6 धावा करून बाद झाला. विशेष म्हणजे, बोल्ट या दोन विकेट्स घेताच विश्वचषकात न्यूझीलंडकडून 50 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज बनला.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1722539668879925615
बोल्टने पुढे याच षटकातील चौथ्या चेंडूवर दुसरी विकेट घेतली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या सदीरा समरविक्रमा यालाही झेलबाद केले. समरविक्रमा डॅरिल मिचेल याच्या हातून झेलबाद झाला. त्याने यावेळी 2 चेंडूत 1 धाव केली होती. अशाप्रकारे श्रीलंका संघाने पहिल्या 5 षटकात तब्बल 3 विकेट्स गमावून 34 धावा केल्या.
विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 41व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड
डेवॉन कॉनवे, रचिन रवींद्र, केन विलियम्सन (कर्णधार), डॅरिल मिचेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टॉम लॅथम (यष्टीरक्षक), टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन
श्रीलंका
पथूम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक/कर्णधार), सदीरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, धनंजया डी सिल्वा, चमिका करुणारत्ने, महीश थीक्षणा, दुष्मंथा चमीरा, दिलशान मदुशंका (Sri lanka lost 3 wickets in just 5 overs score 34 runs NZ vs SL CWC 23)
हेही वाचा-
बंगळुरूत विलियम्सन ‘टॉस का बॉस’, ताफ्यात घातक वेगवान गोलंदाजाची एन्ट्री, लंकेतही एक बदल; पाहा संघ
न्यूझीलंड कर्णधाराने मॅक्सवेलवर उधळली स्तुतीसुमने; म्हणाला, ‘त्या डावातील केवळ धावाच नव्हे…’