2 नोव्हेंबर रोजी भारत विरूद्ध श्रीलंका यांच्यात विश्वचषक 2023 मधाल 33 वा सामना खेळला गेला हेता. भारताने हा सामना भल्या मोठ्या 302 धावांच्या फरकाने जिंकला होता. त्यामुळे हा सामना खूप चर्चेत राहिला. यावर श्रीलंकेतूनही खूप प्रतिक्रिया आल्या. यातच श्रीलंकेचे खासदार विमल विरावनसा यांनी या सामन्यावर मोठा आक्षेप घेतला आहे, ते म्हणाले, भारताची सत्ता आयसीसीवर आहे.
श्रीलंकेच्या लोकसभेत बोलताना ते म्हणाले, “त्या दिवशी भारताविरुद्ध नाणेफेक जिंकल्यानंतर महेला जयवर्धने (Mahela Jayawardene) याने श्रीलंकेच्या कर्णधाराला प्रथम गोलंदाजी घेण्यास सांगितले, भारतीय कर्णधारालाही धक्का बसला की त्यांनी प्रथम गोलंदाजी का निवडली, तेही त्या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करण्यास उत्सुक होते, भारताची सत्ता आयसीसीवर आहे, श्रीलंकेची निवड समितीही भारताने नियुक्त केली आहे, स्पर्धेत कोणतेही उद्घाटन समारंभ नव्हते, परंतु त्यांनी पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात एक समारंभ आयोजित केला होता. क्रिकेटमध्ये काहीतरी मोठे घडत आहे, महेलाने कुसल मेंडिसला प्रथम गोलंदाजी करण्याचा सल्ला का दिला हे शोधून काढले पाहिजे.”
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 8 विकेट्स गमावून 357 धावा केल्या होत्या. शुभमन गिलने सर्वाधिक 92 धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने 88 आणि श्रेयस अय्यरने 82 धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने पाच विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ 55 धावा करू शकला. कसून राजिताने सर्वाधिक 14 धावा केल्या. त्याच्याशिवाय महिष तिक्षिना आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी 12 धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले.त्याचवेळी आठ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट्स घेतली. (Match fixing in India-Sri Lanka match? Uproar in Parliament doubt on Jayawardene role)
म्हत्वाच्या बातम्या
शमीवर जडला ‘या’ अभिनेत्रीचा जीव, खुल्लमखुल्ला केले लग्नासाठी प्रपोज, ठेवलीय फक्त एक अट; जाणून घ्याच
अरे व्वा! भारताच्या ‘या’ 2 शहरांमध्ये होऊ शकते WPL 2024चे आयोजन, तुमच्या तर शहरात नाही? वाचा लगेच