---Advertisement---

खुशखबर! वर्ल्डकप सेमीफायनल आणि फायनलच्या तिकिटांबाबत मोठी अपडेट, कुठे आणि कसे कराल खरेदी? घ्या जाणून

World-Cup-2023
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 स्पर्धा अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. साखळी फेरीतील सामने लवकरच संपणार आहेत. तसेच, उपांत्य आणि अंतिम सामन्यांना सुरुवात होणार आहे. चाहतेही या सामन्यांचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहेत. अशात त्यांच्यापुढे असा प्रश्न आहे की, उपांत्य आणि अंतिम सामन्याची तिकीटे कधी आणि कुठे खरेदी करता येतील? अशात विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम सामन्यांच्या तिकिटांची पुन्हा एकदा विक्री केली जाणार आहे. याविषयी आयसीसी आणि बीसीसीआय दोन्ही बोर्डांनी माहिती दिली आहे. चला तर, त्याविषयी जाणून घेऊयात…

भारत, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या तीन संघांनी विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात एन्ट्री केली आहे. तसेच, न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांपैकी एक संघ उपांत्य फेरीत पोहोचणारा चौथा संघ बनू शकतो. जर न्यूझीलंडने गुरुवारी (दि. 09 नोव्हेंबर) श्रीलंकेला पराभूत केले, तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. तसेच, न्यूझीलंड संघ श्रीलंकेकडून पराभूत झाला आणि पाकिस्तानने इंग्लंडचा पराभव केला, तर ते उपांत्य फेरीत पोहोचतील. अशात लवकरच चौथ्या संघाचा निर्णय होईल.

तिकिटांची विक्री कधीपासून?
अनेक चाहते असे आहे, ज्यांना अजूनही बादफेरीची तिकीटे मिळाली नाहीयेत. मात्र, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने पुन्हा एकदा तिकिटांची विक्री करण्याची घोषणा केली आहे. मुंबईत होणारा पहिला उपांत्य सामना, कोलकाता येथे होणारा दुसरा उपांत्य सामना आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या अंतिम सामन्यांच्या तिकिटांची विक्री एकसोबत होईल.

या सामन्यांची तिकीटे चाहते गुरुवारी म्हणजेच दि. 9 नोव्हेंबर रोजी रात्री 8 वाजता बुक माय शो (BookMyShow) ऍपवर जाऊन बुक करू शकतात. लक्षात घेण्याची बाब अशी की, तिन्ही सामन्यांची तिकीटे एकत्र विकली जातील. अशात कोणत्या सामन्यांची तिकीटे बुक करायची आहेत, याचा निर्णयही चाहत्यांना करावा लागेल.

विश्वचषक तिकिटांसाठी यावेळी खूपच गोंधळ उडाला आहे. बुक माय शोवर गेल्यानंतर चाहत्यांना प्रचंड वाट पाहावी लागली आहे आणि तरीही अनेक चाहत्यांना तिकीटे मिळाली नाहीयेत. (big news world cup 2023 semi final and final match tickets will go live on 8pm thursday)

हेही वाचा-
सलग 5 पराभवांनंतर विजय मिळवताच बटलरची सर्वात मोठी प्रतिक्रिया; म्हणाला, ‘…तर चांगले झाले असते’
शमीवर जडला ‘या’ अभिनेत्रीचा जीव, खुल्लमखुल्ला केले लग्नासाठी प्रपोज, ठेवलीय फक्त एक अट; जाणून घ्याच

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---