ऑस्ट्रेलिया संघाचा अनुभवी अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल याने नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात 40 चेंडूत शतक झळकावले. वनडे विश्चचषक इतिहासातील हे सर्वात वेगवान शतक आहे. हे शतक झळकवल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने एक धक्कादायक विधान केले आहे. यामध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि बीसीसीआय यांच्यावर निशाणा साधला.
नेदरलँड्सविरुद्ध ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने वादळी फलंदाजी केली. त्याने अवघ्या 40 चेंडूत शतक पूर्ण केले. मॅक्सवेलने 44 चेंडूत 9 चौकार आणि 8 षटकारांच्या मदतीने 106 धावांची जबरदस्त खेळी केली. यामुळेच ऑस्ट्रेलियन संघाला 399 धावा करण्यात यश आले. सामना संपल्यानंतर मॅक्सवेल पत्रकार परिषदेसाठी आला, तेव्हा त्याने सामन्याच्या दरम्यान होत असलेल्या लाईट शो वर नाराजी व्यक्त केली. तो म्हणाला,
Glenn Maxwell said, "lightshow is a horrible idea. It takes a while for eyes to readjust and it's the dumbest idea for cricketers. Definitely it's great for the fans, but horrible for the players". pic.twitter.com/zo7N39TzJC
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) October 25, 2023
“सामना दरम्यान होत असलेले लाईट शो ही अत्यंत बकवास कल्पना आहे. त्यामुळे नजर स्थिर होण्यासाठी काही काळ लागतो. ही एक मूर्खपणाची कल्पना म्हणावी लागेल. प्रेक्षकांसाठी हे चांगले असले तरी खेळाडूंसाठी धोकादायक आहे.”
या विश्वचषकात जवळपास प्रत्येक मैदानावर ड्रिंक्स ब्रेक, पहिल्या डावानंतर आणि सामना संपल्यानंतर लाईट शो करण्यात येत आहे. रंगीबिरंगी लाईट मुळे मैदानावर एक वेगळे वातावरण तयार होत असल्याचे दिसते. मात्र, खेळाडूंना याचा त्रास होत असल्याचे जाणवत आहे.
या सामन्याचा विचार केल्यास डेव्हिड वॉर्नर व मॅक्सवेल यांच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने तब्बल 399 धावा उभारल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऍडम झम्पा याने घेतलेल्या चार बळींमुळे नेदरलँडचा डाव अवघ्या 90 धावांमध्ये संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाचा हा सलग तिसरा विजय ठरला.
(Glenn Maxwell Said Light Show Is Horrible Idea In World Cup)
हेही वाचा-
‘देवा अशी बायको सर्वांना दे…’, धवनने ‘त्या’ महिलेविषयी साधला संवाद; व्हिडिओ तुफान व्हायरल
अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने जिंकला टॉस, सामन्यात एकूण 5 धुरंधरांचे पुनरागमन; पाहा Playing XI