‘देवा अशी बायको सर्वांना दे…’, धवनने ‘त्या’ महिलेविषयी साधला संवाद; व्हिडिओ तुफान व्हायरल

भारतीय संघाचा अनुभवी फलंदाज शिखर धवन सध्या क्रिकेटपासून दूर आहे. तो अखेरचा आयपीएल 2023 स्पर्धेत खेळताना दिसला होता. आयपीएलमध्ये तो पंजाब किंग्स संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. दुसरीकडे, धवन यावर्षी भारतीय संघासाठी एकही सामना खेळला नाहीये. मात्र, त्याने संघातील पुनरागमनाची आशा अजूनही कायम ठेवली आहे. तो बॅटमधून चाहत्यांचे मनोरंजन करू शकला नसला, तरीही तो सोशल मीडियावरील आपल्या फोटो आणि व्हिडिओंमुळे नेहमीच चर्चेत असतो. अशात त्याचा एक व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधत आहे.
बुधवारी (दि. 25 ऑक्टोबर) 37 वर्षीय शिखर धवन (Shikhar Dhawan) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत धवन एका अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनदरम्यान समोरच्या महिलेशी झालेल्या संवादाची संपूर्ण कहाणी मजेशीर अंदाजात सांगत आहे. हा व्हिडिओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, “आज कोणाचातरी फोन आला.”
https://www.instagram.com/reel/Cy0p3SaLpej/?utm_source=ig_embed&ig_rid=8d7bfcd6-5b57-411c-810f-968699d0bfdc
धवनच्या या व्हिडिओवर नेटकरी लाईक्सचा पाऊस पाडत आहेत. तसेच, वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. यामध्ये हरभजन सिंग, जतीन सप्रू आणि कॉमेडियन कीकू शारदा याचाही समावेश आहे. यांनी हसणारे इमोजी कमेंट केले आहेत. तसेच, एकाने कमेंट करत लिहिले की, “आता ही रील आहे की रियॅलिटी कसे समजणार?”
धवन मागील काही काळापासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूपच चर्चेत आहे. त्याचा एक्स पत्नी आयेशा मुखर्जी (Ayesha Mukerji) हिच्यासोबत घटस्फोट झाला आहे. मात्र, मुलगा झोरावर (Zoravar) याचा ताबा कोणाला मिळेल, याचा निर्णय अद्याप झाला नाहीये. मात्र, आता तो ऑस्ट्रेलिया आणि भारत दोन्ही जागी आपल्या मुलाला व्हिडिओ कॉलवर बोलू शकतो. मागील काही दिवसांपूर्वी धवनने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक स्क्रीनशॉट शेअर केला होता. यामध्ये तो मुलाशी व्हिडिओ कॉलवर बोलताना खूपच आनंदी दिसत होता.
त्याच्या क्रिकेटविषयी बोलायचं झालं, तर धवनने भारताकडून आपला अखेरचा सामना डिसेंबर 2022मध्ये बांगलादेशविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. त्याच्या अनुपस्थितीत शुबमन गिल याला सलामीला खेळण्याची संधी मिळाली आणि तेव्हापासून तो सातत्याने तिन्ही क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत आहे. (indian cricketer shikhar dhawan reveals the funny conversation behind the phone call from unknown number read)
हेही वाचा-
अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने जिंकला टॉस, सामन्यात एकूण 5 धुरंधरांचे पुनरागमन; पाहा Playing XI
CWC 23: ऑस्ट्रेलियाच्या विजयामुळे पाकिस्तानसाठी संकट, Points Tableमध्ये सर्वात मोठा फेरबदल