आयपीएलमध्ये मागील दोन हंगामात सनरायझर्स हैदराबादची कामगिरी अत्यंत खराब झाली होती. त्यामुळे या संघात वारंवार बदलाचे वारे वाहताना पाहिलं आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वात सनरायझर्स हैदराबादने एकदा जेतेपदावर नाव कोरलं आहे. पण त्यानंतर पुन्हा एकदा सूर गवसणं काही शक्य झालं नाही. त्यामुळे डेविड वॉर्नरला कर्णधारपदावरून दूर केलं. तसेच काही दिवसांपूर्वी एडन मार्करम याच्याकडून नेतृत्वाची धुरा काढून पॅट कमिन्सकडे सोपवली आहे.
त्यामुळे संघात उलथापालथ होत असताना नवी जर्सी समोर आली आहे. या बदलाचा भाग आणि खेळाडूंना प्रेरणा मिळावी या हेतून नवी जर्सी सादर केली आहे. या हंगामात सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू नव्या जर्सीसह उतरणार आहेत. तसेच आज आपण 23 मार्च रोजी पहिला सामना खेळत असलेल्या कमिन्सच्या नेतृत्वाखाली हैदराबादची संभाव्य प्लेइंग इलेव्हन काय असेल याबाबत जाणून घेणार आहोत.
याबरोबरच आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात हैदराबादने कर्णधार पॅट कमिन्ससह पाच खेळाडूंचा त्यांच्या संघात समावेश केला होता. यामध्ये श्रीलंकेचा टी-२० कर्णधार वानिंदू हसरंगा, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड, भारताचा डावखुरा मध्यम वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट, आकाश सिंग आणि जटवेध सुब्रमण्यम यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आयपीएलच्या 17 व्या हंगामात सलामीच्या लढतीत नवा कर्णधार पॅट कमिन्स यापैकी कोणत्या खेळाडूला संधी देणार याकडे बघावे लागणार आहे.
Mark your dates, #OrangeArmy 😍
We start our 🔥 days against the Knights 🧡💜
And we’ll see you at Uppal on the 27th 😍#IPL2024 #IPLSchedule pic.twitter.com/j9kuIIDyfE
— SunRisers Hyderabad (@SunRisers) February 22, 2024
आयपीएलच्या 17 व्या हंगामात सनरायझर्स हैदराबादची भक्कम बाजू म्हणजे त्यांचे परदेशी खेळाडू आहेत. यात आफ्रिकेचा यष्टिरक्षक फलंदाज हेनरिक क्लासेन,ॲडम मार्करम, मार्को जॉन्सन पॅट कमिन्स आहेत. यामुळे पॅट कमिन्स 4 परदेशी खेळाडूंचा वापर कसा करतो हे पहावे लागणार आहे. तसेच पॅट कमिन्स कर्णधार झाल्यानंतर 4 परदेशी खेळाडूंमध्ये 1 स्थान निश्चित झाले आहे.
दरम्यान, सनरायझर्स हैदराबादने कर्णधारपदाची धुरा ऑस्ट्रेलियाचा विश्वचषक विजेता कॅप्टन पॅट कमिन्सकडे सोपवली आहे. न्यूझीलंडने माजी फिरकीपटू डॅनियल व्हिटोरीची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. 2016 मध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या सनरायझर्स संघाचे नशिब यावेळच्या बदलांमुळे बदलणार का? हे काही दिवसांतच स्पष्ट होईल.
आयपीएलच्या पहिल्या सामन्यासाठी सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग 11- मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा,हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), ट्रॅव्हिस हेड,पॅट कमिन्स (कर्णधार), मार्को जॅन्सन, शाहबाज अहमद, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे.
आयपीएलच्या 17 व्या हंगामासाठी सनरायझर्स हैदराबादचा संघ पुढीलप्रमाणे –
अब्दुल समद, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम , मार्को जॅनसेन, राहुल त्रिपाठी, वॉशिंग्टन सुंदर, ग्लेन फिलिप्स, सनवीर सिंग, हेनरिक क्लासेन, भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, टी. नटराजन, अनमोलप्रीत सिंग, मयंक मार्कंडे, उपेंद्रसिंग यादव, उमरान मलिक, नितीश कुमार रेड्डी, फजलहक फारुकी, शाहबाज अहमद, ट्रॅव्हिस हेड, वानिंदू हसरंगा, पॅट कमिन्स (कर्णधार), जयदेव उनाडकट, आकाश सिंग, जाथवेध सुब्रमण्यन.
महत्वाच्या बातम्या –