---Advertisement---

अश्विन खरंच जान्हवी कपूरशी बोलत होता? आयपीएलआधी दिग्गजासोबत मोठा स्कॅम

---Advertisement---

रविचंद्रन अश्विन भारतीय संघासाठी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत महत्वाचा खेळाडू ठरला. त्याने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत सर्वाधिक 26 विकेट्स घेतल्या. सोबतच कसोटी कारकिर्दीतील आपला 100वा सामना आणि 500 कसोटी विकेट्स देखील त्याने याच मालिकेत पूर्ण केल्या. आगामी आयपीएल हंगामात अश्विन पुन्हा एकदा राजस्थान रॉयल्स संघाच्या जर्सीत दिसणार आहे. तत्पूर्वी सोशल मीडियावर अश्विनसोबत घडलेला एक प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे.

जान्हवी कपूर (Janhavi Kapoor) सध्या चर्चेत असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे. दुसरीकडे रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) देखील इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर सर्वांच्या नजरेत आहे. इंग्लंडविरुद्धच्या प्रदर्शनासाठी तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून फिरकीपटूचा खास सन्मान केला गेला. चेन्नईत पार पडलेल्या याच कार्यक्रमातील फोटो अश्विनच्या सोशल मीडिया खात्यावरून नुकतेच पोस्ट झाले. याच पोस्टवर जान्हवी कपुरची कमेंट चाहत्यांना पाहायला मिळाली. अश्विनने देखील जान्हवीला कमेंटमध्ये उत्तर दिले. पण कमेंट्स सविस्तर वाचल्यानंतर चाहत्यांना समजू शकते की, जान्वही कपुरच्या नावाचे हे इंस्टाग्राम खाते फेक आहे.

आयपीएलच्या बातम्यांसाठी आताच व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हा!- इथे क्लिक करा

तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनकडून मिळालेल्या सन्माचे काही फोटो अश्विनने शेअर केल्यानंतर रविंद्र जडेजा याने त्यावर कमेंट केली. जडेजा त्याला विचरातो की, “माझी तमीळ कशी होती.” कारण जडेजाने 100 कसोटी आणि 500 कसोटी विकेट्स पूर्ण केल्यानंतर अश्विनला तमिळमध्येच शुभेच्छा दिल्या होत्या. या कमेंटवर अश्विन लिहितो की, “तुझा बोलण ऐकून मला स्वतःवर ताबा राहिला नाही. मी स्वतःचे हसू रोखू शकलो नाही.” अश्विन आणि जडेजा यांच्यातील या चर्चेत जान्हवी कपूर नावाच्या फेक युजरने लिहिले की, “खूप छान अश्विन.”

त्यानंतर दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, सर हे फेक आहे. एवढेच नाही, तर तो स्वतः या अकाउंटचा ऍडमिन देखील आहे. यावर अश्विन लिहितो, “अरे देवा, असे आहे का? आता माझे ह्रदय तुटले आहे.” अश्विनने पुढे असेही लिहिले की, “तू असे म्हणायला नको होते. हे खाते खरे आहे, असे समजून बोलताना मजा आली.” दरम्यान, अश्विनच्या कमेंट्स बॉक्समधील ही चर्चा पाहूण चाहत्यांनाही मजा घेतली.

राजस्थान रॉयल्स संघाला आगामी आयपीएल हंगामातील आपला पहिला सामना 24 मार्च रोजी लखनऊ सुपर जायंट्सोबत खेळायचा आहे. लीगचा पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळळा जाणार आहे. अश्विन लवकरच राजस्थान रॉयल्सच्या कॅम्पशी जोडला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान अश्विनच्या आईला दुखापत झाली होती, ज्यामुळे फिरकीपटू मालिका अर्ध्यात सोडून घरी परतला होता. याच कारणास्तव तो अद्याप राजस्थानच्या कॅम्पमध्ये दाखल झाला नाहीये.

महत्वाच्या बातम्या – 
सिद्धू इज बॅक! लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर क्रिकेटविश्वात वापसी, कारणही आले समोर
IPL 2024 : नवीन कर्णधार, अन् वेगवान गोलंदाजांचा मारा, पाहा सनरायझर्स हैदराबादची संभाव्य प्लेइंग 11

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---