विश्वचषक 2023 मधील 39वा सामना अफगानिस्तान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात झाला, हा सामना खूप चर्चीला गेला कारण या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने स्नायूंचा त्रास होत असतानाही संघाला सामान जिंकून दिला. त्यामुळे त्याच्यावर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यातच आता न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार केन विल्यमसनने ग्लेन मॅक्सवेलची खेळी अविश्वसनीय असल्याचे म्हटले आहे. विल्यमसनच्या मते, मॅक्सवेल ज्या परिस्थितीत खेळला ती खेळी खरोखरच खास आहे.
7 नोव्हेंबर रोजी झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) याने अफगाणिस्तानने दिलेल्या 292 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 128 चेंडूत 201 धावांची नाबाद खेळी खेळली. त्याची खेळी अधिक खास होती कारण ऑस्ट्रेलियन संघाने अवघ्या 91 धावांत 7 विकेट्स गमावल्या होत्या आणि त्यावेळी त्यांना जिंकणे जवळपास अशक्य झाले होते. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने पॅट कमिन्ससह विक्रमी आठव्या विकेटसाठी 202 धावांची नाबाद भागीदारी केली, ज्यामध्ये कमिन्सचे योगदान केवळ 12 धावांचे होते. या खेळीदरम्यान मॅक्सवेलला खूप शारीरिक वेदना होत होत्या, पण त्याने शेवटपर्यंत हार मानली नाही.
श्रीलंकेविरुद्धच्या सेमीफायनल सामन्यात प्रवेश करण्यापूर्वी पत्रकार परिषदेत केन विल्यमसन (Kane Williamson) याला ग्लेन मॅक्सवेलच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या खेळीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना न्यूझीलंडचा कर्णधार म्हणाला, “होय, ती खरोखरच एक विशेष खेळी होती. त्या डावातील केवळ धावाच नव्हे तर विशेषत: ज्या परिस्थितीत तो खेळला त्या परिस्थितीत. तो खरच शारीरिकदृष्ट्या खूप संघर्ष करत होता. हा ऑस्ट्रेलियासाठी विश्वचषकातील विजयांपैकी सर्वोत्तम विजय आहे आणि कदाचित त्यांच्यासोबत असे घडलेल्या कोणत्याही संघासाठी. अफगाणिस्तानसाठी तो खूप कठीण क्षण होता. ते खूप चांगले खेळत होते. त्यांनी कदाचित 80-90 टक्के सामना जिंकला होता.”
जर आपण न्यूझीलंड क्रिकेट संघाबद्दल बोललो तर, गुरुवारी म्हणजेच 9 नोव्हेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धचा सामना त्यांच्यासाठी बाद फेरीसारखा असेल. हा सामना किवी संघाने जिंकला तर उपांत्य फेरीत पोहोचतील, तर पराभूत झाल्यास स्पर्धेबाहेर होण्याची शक्यता वाढेल. (New Zealand captain heaps praise on Maxwell Said Not only the runs in that innings)
म्हत्वाच्या बातम्या
भारत-श्रीलंका सामन्यात मॅच फिक्सिंग? संसदेत गदारोळ, जयवर्धनेच्या भूमिकेवर शंका
तब्बल 160 धावांनी पराभव होताच नेदरलँड्सच्या कर्णधाराचे लक्षवेधी विधान; म्हणाला, ‘इंग्लंडलाच…’