पुढील महिन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघ वेस्ट इंडीजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यावरील वनडे व टी२० मालिकेसाठी नुकतीच न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली. इंग्लंडविरुद्धच्या जून महिन्यातील कसोटी मालिकेपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून दूर असलेला न्यूझीलंडचा नियमित कर्णधार केन विलियम्सन याचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याच्यासोबत टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट व डेवॉन कॉनवे हे देखील संघाचा भाग होतील. या सर्वांना आयर्लंडविरुद्धच्या मालिकेत विश्रांती देण्यात आली होती.
आठ वर्षानंतर करणार दौरा
न्यूझीलंडचा संघ आठ वर्षांनंतर वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. यापूर्वी २०१४ मध्ये न्यूझीलंड संघाने वेस्ट इंडिज दौरा केला होता. या दौऱ्यातील टी२० मालिकेत न्यूझीलंड संघ विश्वचषकाची तयारी करेल. त्याचबरोबर २०२३ मध्ये होणाऱ्या विश्वचषकाच्या दृष्टीने ही वनडे मालिका महत्त्वाची आहे, कारण त्यात सुपर लीगचे गुणही मिळतील. या दौऱ्यात फलंदाजी प्रशिक्षक म्हणून डीन ब्राउनली आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून ग्रॅमी ऑल्ड्रीज यांना संधी देण्यात आलीये.
युवा खेळाडूंनी केली शानदार कामगिरी
आयर्लंड आणि नेदरलँड्सविरुद्धच्या मालिकेत कर्णधार केन विलियम्सनसह काही वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती. अशा परिस्थितीत न्यूझीलंडच्या युवा खेळाडूंनी आयर्लंडविरुद्ध चमकदार कामगिरी केली. न्यूझीलंडने तीन वनडे आणि तीन टी२० सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडला व्हाईटवॉश दिला. युवा अष्टपैलू मायकेल ब्रेसवेलने आश्चर्यकारक कामगिरी केली. वनडेमध्ये त्याने शेवटच्या षटकात दोन षटकार आणि तीन चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला. यानंतर त्याने टी२० मधील पहिल्याच षटकात हॅट्ट्रिक घेतली. आता न्यूझीलंडला नेदरलँडविरुद्ध दोन टी२० आणि स्कॉटलंडविरुद्ध दोन टी२० तसेच एक वनडे खेळायचा आहे.
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी न्यूझीलंड संघ-
केन विल्यमसन (कर्णधार), फिन ऍलन, ट्रेंट बोल्ट, मायकेल ब्रेसवेल, डेवॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गुप्टिल, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, ईश सोधी व टिम साउदी.
महत्त्वाच्या बातम्या-
माजी क्रिकेटपटूने जय शहांना दाखवला आरसा; म्हणाला, “तुम्ही करताय ते क्रिकेटसाठी…”
यादव-रविची फिरकी आता वेस्ट इंडिजला दाखवणार तारे
गॉल कसोटीवर श्रीलंकेची घट्ट पकड; दुसऱ्या दिवसावर पूर्णपणे यजमानांचे वर्चस्व






