ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात (2022 T20 World Cup) शनिवारी (29 ऑक्टोबर) पहिला सामना अ गटातील न्यूझीलंड व श्रीलंका (NZvSL) यांच्या दरम्यान खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव पावर प्लेमध्ये गडगडला. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी अतिशय नियंत्रित गोलंदाजी करत न्यूझीलंडचे तीन फलंदाज तंबूत पाठवले.
अ गटात अव्वल स्थानी असलेल्या न्यूझीलंड संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध संघाला ताबडतोब सुरुवात देणारे डेवॉन कॉनवे व फिन ऍलन (Finn Allen) यांनी संघासाठी डावाची सुरुवात केली. श्रीलंकेकडून पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या महिश तिक्षणा (Maheesh Theekshana) याने आपल्या संघाला पहिले यश मिळवून देण्यासाठी फारसा वेळ लावला नाही. त्याने पहिल्या षटकाच्या चौथ्याच चेंडूवर ऍलनचा केवळ एका धावेवर त्रिफळा उडवला.
New Zealand in trouble as they lose three big wickets in the Powerplay ????#T20WorldCup | #NZvSL | ????: https://t.co/7YevVnQdfG pic.twitter.com/jRhtECzjUf
— ICC (@ICC) October 29, 2022
त्यानंतर संघासाठी तिसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या अष्टपैलू धनंजय डी सिल्वाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात नाबाद 92 धावांची खेळी केलेल्या डेवॉन कॉनवेला त्रिफळाचीत केले. त्याने देखील केवळ एक धाव बनवली. त्यामुळे संघाचे दोन्ही सलामीवीर धावफलकावर केवळ 7 धावा असताना माघारी परतले. मागील काही काळापासून सातत्याने खराब कामगिरी करणारा न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या सामन्यात देखील अपयशी ठरला. 13 चेंडूवर 7 धावा करत त्याने कसून रजिथाच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षकाकडे झेल सोपवला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पावर प्लेमध्ये 60 पेक्षा जास्त धावा फटकावणारा न्यूझीलंडचा संघ या सामन्यात पावर प्लेमध्ये पुरता अपयशी ठरला. तिक्षणा, रजिथा व डी सिल्वा या तिघांनी न्यूझीलंडला पावर प्लेमध्ये केवळ 4 धावा काढू दिल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘पाकिस्तानकडे खराब कर्णधार’, बाबर आझमबद्दल बोलताना घसरली शोएब अख्तरची जीभ
सामन्यापूर्वी पत्नीचा ‘हा’ नियम पाळतो सूर्यकुमार, फलंदाजीला उतरताच करतो गोलंदाजांचं काम तमाम






