---Advertisement---

सराव सामन्यात न्यूझीलंड-दक्षिण आफ्रिकेने पाडला धावांचा पाऊस, डकवर्थ लुईस नियमाने न्यूझीलंडचा विजय

On: सोमवार, ऑक्टोबर 2, 2023 10:04 PM
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023 आधी खेळल्या जात असलेल्या सराव सामन्यातील सहावा सामना सोमवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळल्या गेलेल्या सामन्यात न्यूझीलंडने डकवर्थ लुईस नियमानुसार 7 धावांनी विजय मिळवला.

तिरुअनंतपुरम येथे झालेल्या या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली. विल यंग केवळ 12 धावांवर बाद झाल्यानंतर सलामीवीर डेवॉन कॉनवे व कर्णधार केन विलियम्सन यांनी मोठी भागीदारी केली. विलियम्सनने 37 धावा केल्यानंतर रिटायर्ड होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूने कॉनवे याने आक्रमक फटकेबाजी करत 73 चेंडूवर 78 धावा केल्या. पावसामुळे खेळ थांबल्यानंतर कॉनवे रिटायर्ड हर्ट झाला. लॅथमने 20 ग्लेन फिलिप्स याने 43 धावा केल्या. डेरिल मिचेलने आक्रमक 25 धावा करत संघाला 321 पर्यंत मजल मारून दिली.

या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रिझा लवकर बाद झाल्यानंतर डी कॉक व डसेन यांनी आक्रमक रूप धारण केले. डसेनने 51 धावा केल्या. तर, क्लासेनने 39 धावा केल्या. डी कॉकने  नाबाद 84 धावांचे योगदान दिले. 37 षटकांत 4 बाद 211 भावा केलेल्या असताना पाऊस आल्याने खेळ थांबवला गेला. अखेर डकवर्थ लुईस नियमानुसार न्यूझीलंडला 7 धावांनी विजयी घोषित केले गेले.

(Newzealand Won By 7 Runs In Warm Up Match Against South Africa)

हेही वाचा-
‘भारताविरुद्ध खेळताना पाकिस्तानी खेळाडू घाबरतात…’, PAK दिग्गजाचे त्याच्याच देशाबद्दल खळबळजनक विधान
‘या’ दोघांना विश्वचषकात संधी मिळणं खूपच कठीण, सेहवागने नावासहित कारणही टाकलं सांगून

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---