ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषकात यजमान भारत व पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. वर्षातील हा सर्वात मोठा सामना असल्याचे म्हटले जाते. उभय संघातील सामने हे नेहमीच काट्याचे राहिले आहेत. दोन्ही देशातील चाहते दोन्ही संघांना मैदानावर पाहण्यास नेहमीच उत्सुक असतात. आता पुढील तीन महिन्यात उभय संघ तब्बल पाच वेळा भिडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वरिष्ठ भारतीय क्रिकेट संघ मैदानात उतरण्याआधी भारताचे युवा खेळाडू इमर्जिंग एशिया कपमध्ये पाकिस्तानशी दोन हात करतील. श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघ पाकिस्तानशी 19 जुलै रोजी कोलंबो येथे भिडेल. या स्पर्धेत भारताच्या अंडर 19 संघाचा माजी कर्णधार यश धूल हा भारतीय संघाचे नेतृत्व करेल. या स्पर्धेनंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये समाविष्ट झालेल्या पुरुष क्रिकेट स्पर्धेत भारताचा पाकिस्तानशी सामना होणार आहे. ही स्पर्धा चीनमध्ये खेळली जाईल.
यानंतर मुख्य भारतीय संघाचा पाकिस्तानशी होणारा सामना आशिया कपमध्ये होईल. भारत व पाकिस्तान हे दोन्ही संघ गटात असून, सुपर फोरमध्ये हे दोन्ही संघ प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. सुपर फोर व त्यानंतर अंतिम सामन्यास दोन्ही संघ पात्र ठरल्यास या एका स्पर्धेत तीन वेळा भारत-पाकिस्तान द्वंद्व रंगेल. त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे विश्वचषकाच्या मंचावर हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहे. त्यानंतर उपांत्य फेरी व अंतिम सामन्यात देखील हे दोन्ही संघ भेटू शकतात. त्यामुळे पुढील तीन महिन्यात दोन्ही संघ जास्तीत-जास्त तब्बल सात वेळा खेळण्याची दाट शक्यता आहे.
(Next 3 Month Blockbuster For India Pakistan Cricket Fans Maximum 7 Times They Meet Each Other)
महत्वाच्या बातम्या-
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा