विराट कोहली, स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूट यांना क्रिकेट जगतातील ‘फॅब 4’ म्हटले जाते. त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीच्या आधारे या चारही फलंदाजांनी ‘फॅब 4’ च्या यादीत स्वतःचा समावेश केला आहे. आता हे चारही दिग्गज निवृत्तीच्या जवळ आले आहेत. अशा परिस्थितीत, आता प्रश्न असा निर्माण होत आहे की पुढील ‘फॅब 4’ खेळाडू कोण असतील? या प्रश्नाचे उत्तर इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन यांनी दिले आहे.
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने ‘फॅब 4’ च्या पुढच्या पिढीसाठी चार युवा फलंदाजांची नावे सांगितली आहेत. नासिर हुसेनने चार फलंदाजांमध्ये भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वालचाही समावेश केला आहे. याशिवाय, त्यांनी ‘फॅब 4’ च्या यादीत या युवा पाकिस्तानी फलंदाजाचा समावेश केला. ‘फॅब 4’ च्या जुन्या यादीत एकाही पाकिस्तानी फलंदाजाचा समावेश नव्हता.
स्काय स्पोर्ट्सवर बोलताना नासेर हुसेन यांनी त्यांच्या ‘फॅब 4’ फलंदाजांच्या यादीत भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल, पाकिस्तानचा युवा सलामीवीर सॅम अयुब, इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक फलंदाज ट्रॅव्हिस हेड यांचे नाव घेतले. मात्र हेडची निवड केल्यानंतर, नासेर हुसेन म्हणाले की तो कदाचित या यादीत बसत नाही. तर त्याच्या जागी त्यांनी श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसचे नाव घेतले.
इंग्लंडच्या माजी कर्णधाराने ‘फॅब 4’ यादीत इंग्लंडच्या हॅरी ब्रूकला अव्वल स्थान दिले. ते म्हणाले की, येणाऱ्या काळात ब्रुक खूप पुढे जाईल. याशिवाय, त्याने भारताच्या यशस्वी जयस्वालला दुसऱ्या स्थानावर ठेवले. जयस्वालबद्दल नासिर म्हणाले की, तो जागतिक क्रिकेटमध्ये खूप धावा करणार आहे. त्यानंतर त्याने तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानच्या सॅम अयुबला स्थान दिले. नासिर हुसेन यांना विश्वास आहे की सॅम भविष्यात पाकिस्तानसाठी काहीतरी करेल. यानंतर त्यांनी चौथ्या क्रमांकावर श्रीलंकेच्या कामिंदू मेंडिसचे नाव घेतले.
हेही वाचा-
या कारणांमुळे विराट कोहली, केएल राहुल नाही खेळणार रणजी ट्रॉफी, बीसीसीआय खपवून घेणार?
vinod kambli birthday special; विनोद कांबळीचा हा रेकाॅर्ड मोडणे अशक्य! जवळपासही कोणी नाही
टीम इंडियात जागा मिळेना, या भारतीय क्रिकेटपटूनं सुरू केली स्वत:ची स्पोर्ट्स अकादमी