ब्राझीलचा सुपरस्टार फुटबॉलपटू नेमार जुनियर लकरच भारतात फुटबॉल खेळताना दिसू शकतो. आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये गुरुवारी (24 ऑगस्ट) नेमार चा अल हिलाल संघ आणि मुंबई सिटी एफसी या संघांना एकाच ग्रुपमध्ये सामील केले गेले. याच पार्श्वभूमीवर नेमार मुंबई सिटीविरुद्धच्या सामन्यासाठी भारतात येणार, असे सांगितले जात आहे.
आशियाई चॅम्पियन लीगमध्ये सहभागी होणारा मुंबई सिटी एफसी केवळ दुसऱ्यांदा सहभागी होत आहे. मागच्या वर्षी मुंबई सिटी (Mumbai City FC) एफसीला आशियाई चॅम्पियन लीगमध्ये एक सामना जिंकता आला होता. अशी कामगिरी करणारा मुंबई इतिहासातील पहिलाच भारतीय संघ ठरला होता. दुसरीकडे जगभरात प्रसिद्धी मिळवेलेला नेमार जुनियर (Neymar Jr) यावर्षी अल हिलाल (Al Hilal) संघासोबत जोडला गेला आहे. या संघाकडून खेळण्यासाठी त्याला 987 करोट डॉलर्सची मोठी रक्कम मिळाली आहे. गुरुवारी आशियाई चॅम्पियन लीग 2023 साठी ग्रुप पाडले गेले. मुंबई सिटी एफसी आणि अल हिलाल एकाच ग्रुपमध्ये ठेवले गेले आहे. या बातमीनंतर नेहमार भारतात खेळणार, अशा जोरदार चर्चे सुरू झाल्या.
https://twitter.com/TheAFCCL/status/1694648134545424756?s=20
आशियाई चॅम्पियन्स लीगमध्ये ग्रुप स्टेडियचे सामने 18 सप्टेंबर रोजी सुरू होणार आहेत. मुंबई सिटी एफसीचे होम ग्राउंड असणाऱ्या पुण्यातील बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये हा सामना होणार, असेही सांगितले जात आहे.
https://twitter.com/MumbaiCityFC/status/1694623283273163156?s=20
https://twitter.com/Xcasm7/status/1694631111400550715?s=20
दरम्यान, काही दिवासंपूर्वीच नेमाह ज्या संघात सहभागी झाला, तो अल हिलाल संघ बेस्ट झोन ग्रुपमध्ये मुंबई सिटीशी भिटणार आहे. दुसरीकडे स्टार फुटबॉलपटू ख्रिस्टियाने रोनाल्ड अल नस्त्र संघाला ग्रुप ई मध्ये ठेवले गेले आहे. अल हिलाल या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे. नेमार या संघाशी जोडला जाण्याआधी पॅरिस सेंट जर्मन संघासाठी खेळत होता. पण आता त्याने या संघाची साथ सोडली असून अल हिलालसाठी खेळत आहे. अल हिलालने नेमारसोबत पुढच्या दोन वर्षांसाठी करार केला आहे. चॅम्पियन्स लीगसाठीच्या ग्रुपची घोषणा केल्यापासून नेमार सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आङे. भारतीय चाहत्यांमध्ये पहिल्यांदा नेमार देशात येणार, यामुळे प्रचंड उत्सुकता आहे. (Neymar Jr will come to India for the match against Mumbai City FC)
महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स, ईगल्स संघांचा दुसरा विजय
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, ईगल्स, गोशॉक्स संघाची विजयी सलामी