टॉप बातम्याबॅडमिंटन

नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत हॉक्स, ईगल्स, गोशॉक्स संघाची विजयी सलामी

पुणे, दि.23 ऑगस्ट 2023- पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस करंडक बॅडमिंटन साखळी स्पर्धेत साखळी फेरीत हॉक्स, ईगल्स, गोशॉक्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून विजयी सलामी दिली.

पीवायसी हिंदू जिमखाना क्लबच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत हॉक्स संघाने कॉमेट्स संघाचा 282-253 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. विजयी संघाकडून राधिका इंगळहळीकर, निखिल चितळे, आनंद शहा, गिरीश खिंवसरा, नीलेश केळकर, आदित्य जीतकर, अनिल देडगे, अक्षय ओक यांनी सुरेख कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात अमित देवधर, सिद्धार्थ साठे, जयदीप गोखले, कर्ण मेहता, चिन्मय चिरपुटकर, संजय परांडे, संदीप साठे, जयदीप कुंटे, बाळ कुलकर्णी, प्रशांत वैद्य यांच्या विजयी कामगिरीच्या जोरावर ईगल्स संघाने स्वान्स संघावर 289-264 असा विजय मिळवला.

अन्य लढतीत गोशॉक्स संघाने बॉबकॅट्स संघाचा 279-251 असा पराभव करून शानदार सुरुवात केली. गोशॉक्स संघाकडून मधुर इंगहळीकर, अनिकेत सहस्त्रबुद्धे, विमल हंसराज, रोहित मेहेंदळे, तुषार मेंगळे, कपिल बाफना, विक्रम ओगले, आशुतोष सोमण, मनाली कुलकर्णी, रोहन पै यांनी अफलातून कामगिरी केली.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
हॉक्स वि.वि.कॉमेट्स 282-253
(गोल्ड ओपन दुहेरी 1: तन्मय आगाशे/मिहिर विंजे पराभुत वि.प्रतीक धर्माधिकारी/पराग चोपडा 17-21, 12-21; गोल्ड ओपन दुहेरी 2: राधिका इंगळहळीकर/निखिल चितळे वि.वि.तन्मय चोभे/आदिती रोडे 21-12, 21-20; खुला दुहेरी 3: आनंद शहा/गिरीश खिंवसरा वि.वि.जयदीप वाकणकर/रमनलाल जैन 21-00, 21-00; खुला दुहेरी 4: नीलेश केळकर/आदित्य जीतकर वि.वि.शिवकुमार जावडेकर/हेमंत पालांडे 21-09, 15-21, 15-12; मिश्र दुहेरी 5: गौरी कुलकर्णी/अमोल काणे पराभुत वि. आनंदिता गोडबोले/सचिन जोशी 16-21, 18-21; ओपन दुहेरी 6: अनिल देडगे/अक्षय ओक वि.वि.पार्थ केळकर/निखिल कानिटकर 15-11, 15-10; ओपन दुहेरी 7 : गौतम लोणकर/स्वरूप कुलकर्णी पराभुत वि.रोहित साठे/आनंद घाटे 07-15, 08-15; ओपन दुहेरी 8: विष्णू गोखले/विनायक भिडे पराभुत वि.संजय फेरवानी/विनित राठी 15-14, 12-15, 12-15);

ईगल्स वि.वि.स्वान्स 289-264
(गोल्ड ओपन दुहेरी 1: अमित देवधर/सिद्धार्थ साठ्ये वि.वि.सारंग आठवले/आदित्य काळे 21-17, 21-20; गोल्ड ओपन दुहेरी 2: सुधांशू मेडसीकर/संग्राम पाटील पराभुत वि.तेजस किंजवडेकर/सिद्धार्थ निवसरकर 16-21, 14-21; ; खुली दुहेरी 3: जयदीप गोखले/कर्ण मेहता वि.वि. अनिश रुईकर/अर्जुन खानविलकर 17-21, 21-17, 15-12; खुली दुहेरी 4: चिन्मय चिरपुटकर/संजय परांडे वि.वि.निशांत भणगे/मनीष शहा 21-11, 21-11; ; मिश्र दुहेरी 5: यश मेहेंदळे/ज्योती राणे पराभुत वि.नेहा लागु/नीरज दांडेकर 08-21, 14-21; खुला दुहेरी 6: संदीप साठे/जयदीप कुंटे वि.वि.अतुल ठोंबरे/विश्वास मोकाशी 15-09, 15-09; खुला दुहेरी 7: बाळ कुलकर्णी/प्रशांत वैद्य वि.वि.रुचा ढवळीकर/अमेय वाकणकर 15-05, 15-07; खुला दुहेरी 8: जयकांत वैद्य/हर्ष जैन पराभुत वि.समीर वर्तक/यश शहा 14-15, 15-11, 11-15);

गोशॉक्स वि.वि.बॉबकॅट्स 279-251
(गोल्ड ओपन दुहेरी 1: नैमिश पालेकर/तुषार नगरकर पराभुत वि.अनिश राणे/सारा नवरे 12-21, 10-21; गोल्ड ओपन दुहेरी 2: कल्याणी लिमये-विंजे/बिपिन देव पराभुत वि.सोहम गाडगीळ/आदित्य गांधी 11-21, 19-21; खुला दुहेरी 3: मधुर इंगळहळीकर/अनिकेत सहस्त्रबुद्धे वि.वि.चिन्मय जोशी/ईशान लागू 21-16, 20-21, 15-12; खुला दुहेरी 4: विमल हंसराज/रोहित मेहेंदळे वि.वि.नकुल बेलवलकर/हरीश अय्यर 21-11, 21-20; मिश्र दुहेरी 5: समीर जालन/ईशा घैसास पराभुत वि.राजश्री भावे/अभिजीत खानविलकर 19-21, 20-21; खुला दुहेरी 6: तुषार मेंगळे/कपिल बाफना वि.वि.राधा बेलवलकर/अनिल कुलकर्णी 15-03, 15-03; खुला दुहेरी 7: विक्रम ओगले/आशुतोष सोमण वि.वि.सोहम कांगो/नील बेलवलकर 15-13, 15-08; खुला दुहेरी 8: मनाली कुलकर्णी/रोहन पै वि.वि.अनिल आगाशे/साकेत गोडबोले 15-09, 09).
(Hawks, Eagles, Goshawks open to victory in 9th PYC-Truspace Badminton League)

महत्वाच्या बातम्या –
नवव्या पीवायसी-ट्रूस्पेस बॅडमिंटन साखळी स्पर्धेत रेव्हन्स संघाची विजयी सलामी
नाद नाद नादच! यो-यो टेस्टमध्ये पास झाला ‘किंग’ कोहली; स्कोर पाहून तुम्हीही म्हणाल, ‘तू भारीच’

Related Articles