---Advertisement---

३०वर्षांनी मोठ्या फूटबाॅलपटूच्या आईला करत होता तो डेट, नंतर आली वेगळीच गोष्ट समोर

On: मंगळवार, एप्रिल 28, 2020 12:21 PM
---Advertisement---

पीएसजीचा स्टार फुटबॉलपटू नेमारने एक खेळाडू म्हणून खूप नाव कमावले आहे. फुटबॉल जगतातील दिग्गज आणि उत्कृष्ट खेळाडूंमध्ये त्याच्या नावाचा समावेश होतो. आपली लोकप्रियता आणि खेळामुळे तो नेहमीच चर्चेत असतो. परंतु मागील काही दिवसांपासून तो नाही तर त्याची आई चर्चेत आली आहे. याचे कारणदेखील तसेच आहे.

नेमारची आई नेदीन गोंसाल्व्हेस आपल्या वैयक्तिक जीवनातील कारणामुळे चर्चेत आली आहे. खरंतर ५२ वर्षीय नदीन आपल्या मुलापेक्षाही ६ वर्ष लहान मुलाला डेट करत होती.

नेदीनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर गेमर टियागो रामोसरबरोबरचे (Tiago Ramos) फोटो शेअर करत खुलासा केला होता की, ती त्याला डेट करत आहे. २०१६मध्ये तिने नेमारचे वडील आणि एजंट वॅगनर रिबेयरोबरोबर २५ वर्षांचे नाते तोडले होते. नेदीनने शेअर केलेल्या फोटोवरून असे वाटत होते की, नेमार (Neymar) या नात्याने खुश आहे.

https://www.instagram.com/p/B-26GxwF476/?utm_source=ig_web_copy_link

नेमारने नेदीन आणि तिचा बॉयफ्रेंडच्या एका फोटोवर कमेंट केली होती की, “तुम्ही खुश रहा. माझं तुमच्यावर प्रेम आहे.” याबरोबरच नेमाच्या वडिलांनीदेखील नेदीनच्या या नव्या नात्यावर आनंद व्यक्त केला. तरीही नेदीन आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये केवळ २ आठवड्यातच ब्रेकअप झाला.

खरंतर नेदीनला जेव्हा समजले की, तिचा बॉयफ्रेंड सुरुवातीला मुलांना डेट करत होता, तेव्हा तिने त्याच्याबरोबरचे नाते तोडले.

माध्यमांमधील काही वृत्तानुसार, रामोसने यापूर्वी नेमारच्या शेफला डेट केले आहे. तसेच त्याने ब्राझीलचा अभिनेता कर्लिनहोसबरोबरही डेट केले आहे. त्यामुळे आता नेदीनबरोबर झालेल्या ब्रेकअपनंतर रामोस आपल्या घरी परतला आहे.

रामोसने २०१७मध्ये नेमारला मेसेज केला होता आणि सांगितले होते की, तो त्याचा खूप मोठा चाहता आहे. त्याने लिहिले होते की, “नेमार तू खूप भारी आहेस. मला माहिती नाही की, एक चाहता म्हणून मी माझी भावना कशाप्रकारे व्यक्त करू. मी जेव्हाही तुला खेळताना पाहतो, तेव्हा मी खूप प्रभावित होतो. एके दिवशी तू हा मेसेज वाचशील अशी अपेक्षा करतो. मी आणि तू भावाप्रमाणे सोबत खेळू.”

ट्रेंडिंग घडामोडी-

-हर्षा भोगलेंचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोक्यात पहिलं काय येतं? मांजरेकर म्हणतात…

-मॅच हारल्यावर धोनी काय करतो? त्या खेळाडूने अखेर जगाला सांगतिला धोनीचा तो ‘राज’

-विश्वविजेत्या खेळाडूंना द्यायला पैसे नव्हते म्हणून लतादीदींनी गायलं होतं गाणं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---