पुणे: पीवायसी हिंदू जिमखाना यांच्या वतीने आयोजित इंडोशॉटले पीवायसी प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीत गुडलक हॉग्स, टायगर्स, गोल्डफिल्ड डॉल्फिन, आर्यन स्कायलार्कस, ओव्हन फ्रेश टस्कर्स या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली तर एनएच वुल्वस संघाने आर्यन स्कायलार्कस संघाचा पराभव करत स्पर्धेत सलग तिसरा विजय संपादन केला.
पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत साखळी फेरीत प्रसाद जाधव नाबाद जलद अर्धशतकी खेळीच्या जोरावर एनएच वुल्वस संघाने आर्यन स्कायलार्कस संघाचा 51धावांनी दणदणीत पराभव केला. पहिल्यांदा खेळताना प्रसाद जाधवच्या नाबाद 56 व प्रशांत वैद्यच्या नाबाद 31 धावांच्या बळावर एनएच वुल्वस संघाने 6षटकात बिनबाद 95धावा केल्या. 95 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पियुष शर्माच्या अचूक गोलंदाजीपुढे आर्यन स्कायलार्कस संघ 6 षटकात 6 बाद 44 धावांत गारद झाला. 22 चेंडूत प्रसाद जाधव नाबाद 56 व 10 धावात 1 गडी बाद करणारा प्रसाद जाधव सामनावीर ठरला.
अन्यअ लढतीत रोहन छाजेड याने केलेल्या नाबाद 34धावांच्या जोरावर गोल्डफिल्ड डॉल्फिन संघाने कासट ड्रॅगन्सचा 8गडी राखून पराभव केला. तन्मय चोभे नाबाद 56धावांच्या अफलातून फलंदाजीच्या जोरावर ओव्हन फ्रेश टस्कर्स संघाने रेड बुल्स संघावर 2धावांनी विजय मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: साखळी फेरी:
एनएच वुल्वस: 6षटकात बिनबाद 95धावा(प्रसाद जाधव नाबाद 56(22), प्रशांत वैद्य नाबाद 31(14)) वि.वि आर्यन स्कायलार्कसः 6 षटकात 6 बाद 44 धावा(अंकुश जाधव 16, पियुष शर्मा 2-4, देवेंद्र राठी 1-5, प्रशांत वैद्य 1-9, अनुज लोहाडे 1-9, प्रसाद जाधव 1-10) सामनावीर प्रसाद जाधव
एनएच वुल्वस संघाने 51धावांनी सामना जिंकला.
कासट ड्रॅगन्स: 6षटकात 5बाद 68धावा(प्रतीक वांगीकर 25(10, 3×6), नितीन सरदेसाई 24(17, 2×4, 1×6), रोहन छाजेड 2-3, नचिकेत जोशी 1-17)पराभूत वि.गोल्डफिल्ड डॉल्फिन: 4.2षटकात बिनबाद 69धावा(रोहन छाजेड नाबाद 34(12,2×4,2×6), अश्विन शहा नाबाद 34(14,1×4,4×6));सामनावीर-रोहन छाजेड; गोल्डफिल्ड डॉल्फिन 8गडी राखून विजयी;.
सुपर लायन्स: 6षटकात 4बाद 50धावा(संदीप साठे नाबाद 28(19,1×4,2×6), श्री शिरोडकर नाबाद 13(4,3×4), उदय जाधव 2-3, समीर जोग 1-4, मंदार चितळे 1-5) पराभूत वि.गुडलक हॉग्स लिमये: 4.2षटकात बिनबाद 53धावा(समीर जोग नाबाद 16(15,1×6), देवेंद्र चितळे नाबाद 31(14, 1×4,3×6));सामनावीर-उदय जाधव; गुडलक हॉग्स लिमये 8गडी राखून विजयी;
टायगर्स: 6षटकात 1बाद 78धावा(मधुर इंगहाळीकर नाबाद 35(18,4×4,1×6), अभिषेक ताम्हाणे 22(12), अमित कुलकर्णी नाबाद 16, असीम देवगावकर 1-10)वि.वि.गोखले सिनर्जी कोब्राज: 6षटकात 2बाद 46धावा(विमल हंसराज 18(10), विशाल गोखले नाबाद 16(16), अमित कुलकर्णी 1-16);सामनावीर-मधुर इंगहाळीकर;
आर्यन स्कायलार्कस: 6षटकात 4बाद 65धावा(जयदीप गोडबोले 16(9), शार्दुल वाळिंबे 16(11), बाळ कुलकरन 12, पिनाकिन मराठे 2-9)वि.वि.अंजनेया ब्रेव बिअर्स: 6षटकात 5बाद 53धावा(गौरव सावगावकर 30(18,3×4), अंजनेया साठे 11, शिवकुमार जावडेकर 10, आदित्य गांधी 2-1, सोहन आंगळे 1-3);सामानावीर-आदित्य गांधी; आर्यन स्कायलार्कस 12धावांनी विजयी;
ओव्हन फ्रेश टस्कर्स: 6षटकात 4बाद 78धावा(श्रीनिवास चाफळकर 30(13, 1×4, 3×6), हर्षल गंद्रे 21(13), शिरीष आपटे 19(10), तन्मय चोभे 1-3, समीर जोशी 1-5, अभिजित खानविलकर 1-16)वि.वि.रेड बुल्स: 6षटकात 2बाद 76धावा(तन्मय चोभे नाबाद 56(21, 2×4,6×6), नंदन डोंगरे 13(13), दर्शन कांकरिया 1-5, श्रीनिवास चाफळकर 1-9);सामनावीर-तन्मय चोभे; ओव्हन फ्रेश टस्कर्स