---Advertisement---

दिलदार विलियम्सन! ९९वर बाद झालेल्या ऋतूराजचं पहिलं सांत्वन केलं विलियम्सनने

Kane-Williamson-And-Ruturaj-Gaikwad
---Advertisement---

मागील हंगामात म्हणजेच आयपीएल २०२१मध्ये ऑरेंज कॅप आपल्या नावावर करणाऱ्या ऋतुराज गायकवाडची बॅट आयपीएल २०२२मध्ये शांत होती. मात्र, त्याने रविवारी (दि. ०१ मे) सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील आयपीएल २०२२च्या ४६व्या सामन्यात पुन्हा लय पकडली. त्याने जोरदार फटकेबाजी करत आधी अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतर आपल्या शतकासाठी वेगाने वाटचाल केली. असे असले, तरीही त्याचे शतक १ धावेने हुकले. तो ९९ धावांवरच तंबूत परतला. यावेळी सर्वप्रथम हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सनने त्याची पाठ थोपटली. त्याच्या या अंदाजाने विलियम्सन सर्वांची मने जिंकली. यादरम्यानचा फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

झाले असे की, या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघ आला होता. यावेळी चेन्नईकडून सलामीला ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि डेवॉन कॉनवेने मोर्चा सांभाळत जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. यावेळी ऋतुराजने सर्वांचे लक्ष वेधले. त्याने ३३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर तो वेगाने आपल्या शतकाच्या दिशेने जाऊ लागला. त्याची फलंदाजी पाहून असे वाटत होते की, ऋतुराज नक्कीच आयपीएलमध्ये त्याचे दुसरे शतक पूर्ण करेल. मात्र, तसे काहीच झाले नाही.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

हैदराबादच्या कर्णधाराने केले ऋतुराजचे सांत्वन
हैदराबादकडून अठरावे षटक टाकत असलेल्या टी नटराजनने पाचवा चेंडू स्लोअर लेंथवर टाकला. यावेळी ऋतुराजने फटका मारत एक धाव घेण्याचा प्रयत्नही केला. मात्र, त्याने मारलेला चेंडू थेट बॅकवर्ड पॉईंटवर उभ्या असलेल्या भुवनेश्वर कुमारच्या हातात गेला. त्यामुळे ऋतुराजला दुर्दैवाने ९९ धावांवर तंबूत परतावे लागले. यावेळी हैदराबादचा कर्णधार केन विलियम्सन निराश होऊन तंबूत परत चाललेल्या ऋतुराजला हात मिळवण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने ऋतुराजच्या खेळीसाठी त्याची पाठ थोपटली. विलियम्सन नेहमीच त्याच्या अशा अंदाजासाठी ओळखला जातो. यावेळी त्याच्यासोबत हैदराबादचे इतर खेळाडूही होते. यादरम्यानचे फोटो आणि व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/ashMSDIAN7/status/1520790951153004544

https://twitter.com/AadiSudeepian/status/1520791740449361920

ऋतुराजसाठी महत्त्वाचा सामना
विशेष म्हणजे, ऋतुराज हा पुणेकर आहे. तो आई-वडिलांसह जुनी सांगवी येथे राहतो. त्याच्यासाठी हा महत्त्वाचा सामना होता. कारण, हा सामना पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर पार पडला. त्यातही १ मे म्हणल्यावर या दिवशी महाराष्ट्र दिन साजरा केला जातोय. मात्र, ऋतुराजला या सामन्यात आपले शतक झळकावता आले नाही. या स्टेडिअमवर आयपीएल २०२२च्या २९व्या सामन्यात ऋतुराजने ७३ धावांची खेळी साकारली होती.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

शंभराहून मोलाचे नव्व्याण्णव! ऋतुराजचे आयपीएलमधील दुसऱ्या शतकाचे स्वप्न भंगले

रोहितची विकेट पडल्यावर ढसाढसा रडली पत्नी रितिका

‘त्याला कर्णधार बनवलेच कशासाठी…’, जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर भारताच्या दिग्गज कर्णधाराने साधला निशाणा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---