आयपीएल 2025 च्या मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल संघापासून वेगळा झाला आहे. सर्व 10 फ्रँचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सादर करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. त्यापूर्वी एका अहवालात दावा केला जात आहे की, एलएसजीनं कर्णधार राहुलला पहिलं रिटेन्शनं म्हणून स्थान दिलं होतं, परंतु त्यानं यासाठी नकार दिला.
राहुलनं आयपीएल 2022 मध्ये पदार्पण करणाऱ्या लखनऊचं गेल्या तीन हंगामात नेतृत्व केलं. यापैकी संघ दोनदा प्लेऑफमध्ये पोहोचला. मात्र ते एकदाही ट्रॉफी जिंकू शकले नाही. आता भारताचे माजी मुख्य निवडकर्ते सबा करीम यांनी राहुलच्या जागी एलएसजीचा कर्णधार कोण होणार? त्या खेळाडूचं नाव उघड केलं आहे.
सबा करीम यांच्या मते, वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोलस पूरन कर्णधारपदाचा सर्वात मोठा दावेदार आहे. याशिवाय त्यांनी युवा फलंदाज आयुष बदोनीची देखील प्रशंसा केली. सबा करीम म्हणाले की, बदोनी संघाला लवचिकता प्रदान करतो. तो गरज असेल तेव्हा उजव्या हातानं ऑफ-स्पिन गोलंदाजी करण्यास सक्षम आहे.
सबा करीम पुढे म्हणाले, रिटेन होणाऱ्या खेळाडूंमध्ये एलएसजीची सर्वोच्च निवड निकोलस पूरन आहे. रवी बिश्नोई हा दुसरा उत्तम पर्याय आहे. याशिवाय अमित मिश्रा देखील आहे, जो अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन होऊ शकतो. निकोलस पूरन याच्याकडे इतर लीगमध्ये नेतृत्वाचा अनुभव असल्यानं तो येथे देखील नेतृत्व करू शकतो. अनुभवी क्विंटन डी कॉक देखील आहे. परंतु मला देवदत्त पडिक्कलबद्दल खात्री नाही. एलएसजी निश्चितपणे रवी बिश्नोई आणि बदोनी यांसारख्या पर्यायांचा विचार करेल.
हेही वाचा –
काय सांगता! एका चेंडूत बनल्या चक्क 10 धावा, कसोटी सामन्यात घडली अनोखी घटना!
मुंबई कसोटीत हर्षित राणाला पदार्पणाची संधी मिळणार का? सहाय्यक प्रशिक्षकांची मोठी प्रतिक्रिया
केएल राहुलनं लखनऊची साथ सोडली! लिलावात हे 4 संघ लावू शकतात मोठी बोली