टी20 विश्वचषकातील (T20 World Cup) दुसरा सामना आज (2 जून) रोजी प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे खेळला जात आहे. वेस्ट इंडीज (West Indies) विरुद्ध पापुआ न्यू गिनी (Papua new guinea) यांच्यामध्ये ही लढत चालू आहे. तत्पूर्वी वेस्ट इंडीज संघाचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलचं (Chris Gayle) रेकाॅर्ड धोक्यात आहे. ख्रिस गेल वेस्ट इंडीजसाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. परंतु वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरन गेलचं रेकाॅर्ड मोडून वेस्ट इंडीजसाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावा बनवण्याचा इतिहास रचू शकतो.
वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार निकोलस पूरननं (Nicholas Pooran) 88 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1848 धावा बनवल्या आहेत. त्याला ख्रिस गेलचं रेकाॅर्ड मोडीत काढण्यासाठी फक्त 52 धावांची आवश्यकता आहे. ख्रिस गेलनं वेस्ट इंडीजसाठी टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 79 सामन्यात 1899 धावा बनवल्या आहेत. 2012 आणि 2014 साली वेस्ट इंडीजला चॅम्पियन बनवण्यासाठी गेलनं मोलाचं योगदान दिलं आहे.
वेस्ट इंडीजचा धडाकेबाज फलंदाज निकोलस पूरन आयपीएल 2024च्या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग होता. आयपीएलच्या हंगामात त्यानं चांगली फटकेबाजी केली. आयपीएलमध्ये तो चांगलाच फाॅर्ममध्ये दिसत होता. आयपीएलमध्ये पूरनने लखनऊ सुपर जायंट्ससाठी आक्रमक अंदाजात 499 धावा ठोकल्या.
टी20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सराव सामन्यात पूरननं उत्तुंग फटकेबाजी केली. त्यानं केवळ 25 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळी खेळली होती. यंदाच्या टी20 विश्वचषकात पूरनकडून वेस्ट इंडीजला चांगल्या योगदानाची अपेक्षा असेल. तसंच ख्रिस गेलनं वेस्ट इंडीजसाठी 124 सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. तर निकोलस पूरननं वेस्ट इंडीजसाठी 115 षटकार ठोकले आहेत. पूरनला ख्रिस गेलचं षटकारांचदेखील रेकाॅर्ड मोडित काढण्याची संधी आहे.
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक धावा
ख्रिस गेल- (1899 धावा)
निकोलस पूरन- (1848 धावा)
मार्लन सॅम्युअल्स- (1611)
कायरन पोलार्ड- (1569)
लेंडल सिमन्स- (1527)
टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडीजसाठी सर्वाधिक षटकार
ख्रिस गेल- 124
निकोलस पूरन- 115
एविन लुईस- 111
कायरन पोलार्ड- 99
रोवमन पाॅवेल- 87
महत्त्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडीजनं जिंकला टॉस, प्रथम गोलंदाजीचा निर्णय; जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
अमेरिकन सुरक्षा यंत्रणा सज्ज! विराट कोहलीची सुरक्षा पाहून व्हालं थक्क
कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यात चालायं तरी काय? सामन्यातील दोन निर्णयांमुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम!