टी20 विश्वचषक 2024चा पहिला सामना अमेरिका विरुद्ध कॅनडा यांच्यामध्ये खेळला गेला. अमेरिकनं कॅनडाचा 7 विकेट्सनं पराभव करुन यश मिळवलं. परंतु आज (2 जून) रोजी वेस्ट इंडीज समोर पापुआ न्यू गिनी संघाचं आव्हान आहे. प्रोव्हिडन्स स्टेडियम, गयाना येथे हा सामना खेळला जातोय. वेस्ट इंडीजचा कर्णधार रोवमन पाॅवेलनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
वेस्ट इंडीज- ब्रँडन किंग, जॉन्सन चार्ल्स, रोस्टन चेस, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल (कर्णधार), शेरफेन रदरफोर्ड, आंद्रे रसेल, रोमॅरियो शेफर्ड, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, अकेल होसेन
पापुआ न्यू गिनी– टोनी उरा, सेसा बाऊ, असाद वाला (कर्णधार), लेगा सियाका, हिरी हिरी, चार्ल्स अमिनी, चाड सोपर, किपलिन डोरिगा (यष्टीरक्षक), आले नाओ, काबुआ मोरिया, जाॅन कारिको
वेस्ट इंडीज विरुद्ध पापुआ न्यू गिनी या दोन संघांच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचं झालं तर याआधी दोन्ही संघ एकमेकाविरुद्ध कधीही भिडले नाहीत. टी20 विश्वचषकाच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. त्यामुळे पापुआ न्यू गिनी संघ वेस्ट इंडीज संघाशी सामना करेल हे पाहणंदेखील महत्त्वाचं ठरणार आहे. वेस्ट इंडीज संघ 2012 आणि 2016 टी20 विश्वचषक विजेता आहेत. डॅरेन सॅमी कर्णधार असताना वेस्ट इंडीजनं 2012 ला पहिला टी20 विश्वचषक जिंकला होता. तर दुसराही टी20 विश्वचषक डॅरेन सॅमीच्या नेतृत्वाखाली वेस्ट इंडीजनं 2016 ला जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यात चालायं तरी काय? सामन्यातील दोन निर्णयांमुळे चाहत्यांच्या मनात संभ्रम!
रोहित शर्मा यशस्वी जयस्वाल नाही तर ‘हे दोन’ खेळाडू करतील विश्वचषकात टीम इंडीयासाठी सलामी!
भारत-बांगलादेश सराव सामन्यादरम्यान संजय मांजरेकरांचा रवींद्र जडेजाला टोला!






