---Advertisement---

पूरनच्या फॉर्मने हैदराबादला चढले स्फुरण; भारताविरुद्ध सलग तीन अर्धशतकांसह मोठे विक्रम नावावर

On: सोमवार, फेब्रुवारी 21, 2022 4:05 PM
Nicholas-Pooran
---Advertisement---

कोलकाता। भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (India vs West Indies) संघात ईडन गार्डन्सवर झालेल्या ३ सामन्यांच्या टी२० मालिकेत (T20I Series) रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील भारतीय संघाने ३-० अशा फरकाने विजय मिळवला. या मालिकेतील अखेरचा सामना रविवारी भारताने १७ धावांनी जिंकला. असे असले तरी, या मालिकेत वेस्ट इंडिजचा एक फलंदाज या मालिकेदरम्यान दमदार फॉर्ममध्ये दिसला. तो फलंदाज म्हणजे निकोलस पूरन (Nicholas Pooran). 

पुरनने अनेक विक्रमांना घातली गवसणी
पुरन या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने मालिकेतील सर्व सामन्यांत अर्धशतक केले. त्यामुळे त्याच्या नावावर मालिकेत ६१.३३ च्या सरासरीने १८४ धावा जमा झाल्या. याचबरोबर तो भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये सलग तीनवेळा ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा ब्रेंडन मॅक्यूलमनंतरचा दुसरा खेळाडू ठरला.

त्याने पहिल्या सामन्यात ४३ चेंडूत ६१ धावा, दुसऱ्या सामन्यात ४१ चेंडूत ६२ धावा आणि तिसऱ्या सामन्यात ४७ चेंडूत ६१ धावा केल्या होत्या.

त्यामुळे निकोलस पूरन ३ सामन्यांच्या टी२० मालिकेतील सर्व सामन्यांत ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी असा विक्रम विराट कोहलीने २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध केला होता. तसेच कॉलिन मुनरोने २०१७-१८ च्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत, तर डेव्हिड वॉर्नरने २०१९ साली श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत केला आहे (3 Consecutive Fifties in the T20 series).

पूरनला आयपीएल लिलावात मिळाली मोठी किंमत
पूरनच्या या फॉर्ममुळे सनरायझर्स हैदराबाद संघ खूश असेल. कारण, हैदराबाद संघाने आयपीएल २०२२ हंगामासाठी झालेल्या लिलावात पूरनला १० कोटी ७५ लाख रुपयांना खरेदी केले आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी पूरन फॉर्ममध्ये परतणे गरजेचे होते. पूरनने टी२० मालिकेपूर्वी झालेल्या वनडे मालिकेत धावांसाठी संघर्ष केला होता. त्याला वनडे मालिकेतील तीन सामन्यात ६१ धावाच करता आल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या – 

रोहितसेनेला त्यांच्याच भूमीत काट्याची टक्कर देण्यासाठी ‘असा’ आहे श्रीलंकेचा टी२० संघ, एका खेळाडूचे पुनरागमन

धवन स्टाइलमध्ये जल्लोष पाकिस्तानी खेळाडूला पडला महागात, दोन वेळा भरावा लागला दंड

वेंकटेश अय्यरचा ३६० डिग्री षटकार पाहून सोशल मीडियावर होतेय वाहवा, पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---