आईपीएल मध्ये गुरुवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबला 69 धावांनी पराभूत केले. पण असे असले तरी पंजाबतर्फे 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना धडाकेबाज फलंदाज निकोलस पुरनने केलेल्या 37 चेंडूत 77 धावांची तुफानी खेळीबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पुरनने 17 चेंडूत ठोकले अर्धशतक
पूरनने त्याच्या फलंदाजीने काही काळ हैदराबादला घाबरवून सोडलं होतं. असं वाटत होतं की पुरन पंजाबला सामना जिंकवून देऊ शकतो. तो आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला असला तरी त्याने अवघ्या 17 चेंडूंवर अर्धशतक झळकावत आयपीएलच्या या हंगामातील सर्वात वेगवान अर्धशतक ठोकण्याचा मान मिळवला.
केएल राहुलने ठोकले होते वेगवान अर्धशतक
आयपीएलमधील वेगवान अर्धशतकाची नोंद पंजाबचा कर्णधार केएल राहुलच्या नावावर आहे. राहुलने 2018 मध्ये अवघ्या 14 चेंडूंवर अर्धशतक ठोकले. दुसर्या क्रमांकावर धडाकेबाज फलंदाज युसुफ पठाण आणि फिरकीपटू सुनील नरेन आहेत. या दोघांनीही 15 चेंडूंवर अर्धशतक ठोकले होते. याशिवाय आतापर्यंत 8 फलंदाजांनी 17 चेंडूत अर्धशतक ठोकले आहे. ज्यामध्ये आता पूरनच्या नावाचाही समावेश झाला आहे. या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक आहे. यापूर्वी राजस्थान रॉयल्सचा फलंदाज संजू सॅमसनने चेन्नईविरुद्ध शारजाहच्या मैदानावर 19 चेंडूत 50 धावा केल्या होत्या.
एका षटकांत ठोकल्या 28 धावा
पाचव्या षटकात फलंदाजीसाठी आलेल्या पुरनने चौकार मारून डावाची सुरुवात केली. सहाव्या षटकात त्याने नटराजनच्या चेंडूवर शानदार षटकार ठोकला. सातव्या षटकात सलग दोन चेंडूंत दोन षटकार ठोकले. कर्णधार केएल राहुल बाद झाल्यावरही त्याने फटकेबाजी सुरूच ठेवली. 9 व्या षटकात गोलंदाजीला आलेला फिरकीपटू अब्दुल समदच्या षटकात त्याने 28 धावा फटकावल्या. त्याने समदच्या पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. दुसर्या चेंडूवर चौकार ठोकला. यानंतर, सलग तीन चेंडूंवर तीन लांबलचक षटकार ठोकले. या षटकारांची लांबी 100 मीटरपेक्षा जास्त होती.
37 चेंडूत केल्या 77 धावा
पंजाबचे एकामागून एक गडी बाद होतं होते पण दुसर्या बाजूने पुरन सतत फटकेबाजी करत होता. केवळ 17 चेंडूत अर्धशतक ठोकणार्या पुरनने अवघ्या 37 चेंडूंत 77 धावांची दमदार खेळी केली. यादरम्यान त्याने 5 चौकार आणि 7 षटकार लगावले. म्हणजेच त्याने चौकार आणि षटकारांच्या मदतीने 62 धावा केल्या.
महत्त्वाच्या बातम्या-
मॅक्सवेल होतोय ट्रोल, तर पूरन, राशिदवर होतोय कौतुकाचा वर्षाव; पाहा काही खास ट्विट्स
IPL 2020: आज दिल्ली-राजस्थान येणार आमने सामने, जाणून घ्या सामन्याबद्दल सर्वकाही
डेन्मार्क खुली बॅडमिंटन स्पर्धा – सायना नेहवाल, पी कश्यपची स्पर्धेतून माघार
ट्रेंडिंग लेख-
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-यंदाच्या आयपीएल हंगामात ‘या’ ३ संघांकडे आहे सर्वोत्तम गोलंदाजीचे आक्रमक
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी