वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज निकोलस पूरननं शुक्रवारी (23 ऑगस्ट) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या झंझावाती खेळी खेळली. यासह तो टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा तिसरा खेळाडू बनला आहे.
पूरननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात 26 चेंडूत 65 धावांची विस्फोटक खेळी खेळली. या खेळीत त्यानं दोन चौकार आणि तब्बल 7 षटकार मारले. ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात त्यानं टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सूर्यकुमार यादव आणि जोस बटलरला मागे टाकलं आहे.
सामना सुरू होण्यापूर्वी निकोलस पूरन आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत सातव्या स्थानावर होता. या एका खेळीनंतर त्यानं ग्लेन मॅक्सवेल, सूर्यकुमार यादव आणि जोस बटलरसारख्या स्फोटक फलंदाजांना मागे टाकलं आहे. निकोलस पूरनच्या पुढे आता फक्त मार्टिन गुप्टिल (173) आणि रोहित शर्मा (205) आहेत. पुरनच्या या खेळीच्या जोरावर वेस्ट इंडिजनं पहिल्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
Nicholas Pooran smashed 4 sixes in a row against South Africa. 🫡⚡pic.twitter.com/yw5p5bD93r
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 24, 2024
प्रथम फलंदाजी करताना ट्रिस्टन स्टब्सच्या 76 आणि पॅट्रिक क्रुगरच्या 44 धावांच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं 20 षटकांत 7 गडी गमावून 174 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजकडून मॅथ्यू फोर्डनं 3 आणि शेमर जोसेफनं 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरात, धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजनं दमदार सुरुवात केली. एलिक एथानाजे आणि शाई होप यांच्यात पहिल्या विकेटसाठी 84 धावांची भागीदारी झाली. एलिक 30 चेंडूत 40 धावा करून बाद झाला. तर होपनं 36 चेंडूत 51 धावा केल्या. यानंतर पूरननं 26 चेंडूत 65 धावांची तुफानी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार
रोहित शर्मा – 205 (159 सामने)
मार्टिन गुप्टिल – 173 (122 सामने)
निकोलस पूरन – 139 (96 सामने)
जोस बटलर – 137 (124 सामने)
सूर्यकुमार यादव – 136 (71 सामने)
हेही वाचा –
आफ्रिदी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन, शाहिनच्या पत्नीनं दिला बाळाला जन्म
शिखर धवनसारखा मित्र मिळणं दुर्मिळच! या 3 घटनांनी जिंकलंय चाहत्यांचं मन
शिखर धवनच्या निवृत्तीनंतर हे 3 खेळाडूही करू शकतात क्रिकेटला अलविदा