भारत आणि ऑस्ट्रेलिया संघातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेचा पहिला सामना ऍडलेड येथे चालू आहे. या सामन्यात सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ याची फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या दोन्ही विभागातील कामगिरी अत्यंत वाईट राहिली. खराब फॉर्ममध्ये असलेला शॉ पहिल्या डावात सिल्वर डक झाला, तर दुसऱ्या डावात केवळ ४ धावा करु शकला. शॉच्या या फ्लॉप प्रदर्शनानंतर चाहत्यांपासून ते क्रिकेट दिग्गजांपर्यंत सर्वजण त्याच्यावर टीका करत आहेत.
पृथ्वी शॉची फलंदाजी शैली अत्यंत वाईट
भारत-ऑस्ट्रेलिया दिवसरात्र कसोटी सामन्याचे समालोचक आणि ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू निक नाइट यांनीही शॉ याच्यावर टीका केली आहे. ते म्हणाले की, “ही खरोखरच विचार करण्याजोगी गोष्ट आहे. शॉचा बॅकलिफ्ट दुसऱ्या आणि तिसऱ्या स्लिपमधून येत आहे. ऑस्ट्रेलिया संघाच्या वेगवान गोलंदाजांना ही शैली ज्ञात आहे. त्यामुळे शॉला बाद करणे त्यांच्यासाठी खूप साधे काम आहे. कसोटी सामन्याच्या आधीपासून मी पाहत आहे. शॉने त्याच्या फलंदाजी शैलीत तिळभरही सुधारणा केलेली नाही.”
तसेच पुढे बोलताना नाइट यांनी शॉला दुसऱ्या कसोटी सामन्यातून संघाबाहेर करण्यात यावे, असा सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, “जेव्हा कोणता खेळाडू स्वत:ला आंतरराष्ट्रीय स्तरावर सिद्ध करुन दाखवतो. तेव्हा काही काळाच्या खराब फॉर्मनंतरही त्याला संधी दिल्या पाहिजेत. पण सध्या शॉची फलंदाजी शैली पाहून मला वाटते की त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात विश्रांती देण्यात यावी.”
शुबमन गिलऐवजी दिली पृथ्वी शॉला संधी
कसोटी मालिकेची सुरुवात होण्यापुर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांमध्ये २ सराव सामने खेळण्यात आले होते. या दोन्ही सराव सामन्यात मिळून शॉने ६२ धावा केल्या होत्या, तर गिलने शॉच्या दुपट्टीपेक्षा जास्त १३७ धावा केल्या होत्या. यात एका अर्धशतकाचाही समावेश होता. तरीही भारतीय कर्णधार विराट कोहलीने शॉवर जास्त विश्वास दाखवत त्याला पहिल्या कसोटी सामन्यात संधी दिली. पण शॉ विराटच्या विश्वासावर खरा उतरु शकला नाही.
ANOTHER chance for Marnus! #AUSvIND pic.twitter.com/zl25xRJjIX
— cricket.com.au (@cricketcomau) December 18, 2020
फलंदाजीबरोबर क्षेत्ररणातही त्याने चमकदार कामगिरी केली नाही. त्याने सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मार्नस लॅब्यूशानेचा महत्त्वपूर्ण झेल सोडला.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉची खराब फिल्डिंग पाहून भारतीय कर्णधाराचा राग अनावर, मैदानावरच दिली शिवी
“शुबमन गिलने सहाव्या क्रमाकांवर फलंदाजी करावी”, माजी भारतीय क्रिकेटरचा सल्ला
विराटच्या पहिल्या बाळाचा पाळणा हालणार ऑस्ट्रेलियात?, माजी ऑसी क्रिकेटरने दिले आमंत्रण