भारतीय संघाचा कर्णधार रोहीत शर्मा हिंदी, मराठी, इंग्रजीबरोबर अाणखी एका भाषेत संवाद साधताना दिसला आहे. अंतिम सामन्यापुर्वी रोहीत शर्मा श्रीलंकेच्या दोन कट्टर फॅनसोबत सिंहली भाषेत संवाद साधताना दिसला.
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत ट्वीटरवरुन रोहीतचा हा खास विडीओ शेअर करण्यात आला आहे. यावेळी काही रोज संवाद साधताना जे शब्द सिंहली भाषेत वापरले जातात ते शब्द रोहीत निलम आणि ग्यान या श्रीलंकेच्या दोन कट्टर फॅनला विचारताना दिसला.
यावेळी रोहीतने ‘तुम्ही कसे आहात?’,’तुमचे नाव काय आहे?’, ‘मी श्रीलंका संघाच्या सर्वात मोठ्या दोन चाहत्यांसोबत आहे?’, आम्हाला तुम्ही दिलेला पाठींबा आवडला’ असे काही प्रश्न यावेळी त्या दोन चाहत्यांना विचारले.






