बर्मिंघम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रविवारी (७ ऑगस्ट) भारताला बॉक्सिंगमध्ये तिसरे सुवर्णपदक मिळाले. नीतू आणि अमित पंघल यांच्यानंतर सायंकाळी झालेल्या सामन्यात विश्वविजेत्या निखत झरीनने सुवर्णपदक जिंकत आपल्याकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता केली. निखतने नॉदर्न आयर्लंडच्या मॅक नॉलला पराभूत करत आपल्या पहिल्याच राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकण्याची कामगिरी करून दाखवली.
GOLD🥇 FOR INDIA 🇮🇳
Nikhat Zareen wins gold medal in Women's 50 Kg event 🥊#TeamIndia | #Cheer4India | #B2022 | #CWG2022 pic.twitter.com/GcmYxaQg9y
— Doordarshan Sports (@ddsportschannel) August 7, 2022
महिलांच्या ५० किलो वजनी गटातील विश्वविजेती असलेल्या निखतने या अंतिम फेरीत अगदी तसाच खेळ दाखवला. नॉदर्न आयर्लंडच्या मॅक नॉलला तिने तिन्ही फेऱ्यांमध्ये डोके वर काढू दिले नाही. मॅक नॉल ही गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक विजेती होती. निखत नॉलपेक्षा वयाने सात वर्षांनी लहान आहे. याच ऊर्जेचा तिने फायदा करून घेतला. पहिल्या फेरीमध्ये तिने अत्यंत आक्रमकपणा दाखवत नॉलला थकवत पाचही पंचांचा कौल आपल्या बाजूने लावून घेतला.
दुसऱ्या फेरीमध्ये नॉल अधिकच थकलेली दिसली. याचा पुन्हा एकदा फायदा निखतला मिळाला. दुसरे फेरीमध्ये देखील तिचेच वर्चस्व राहिले. अखेरच्या फेरीमध्ये मात्र निखतने काहीसा संयम दाखवला व अतातायीपणा न करता आपले सुवर्णपदक निश्चित केले.
तिच्या आधी युवा बॉक्सर नीतू व अनुभवी पुरुष बॉक्सर अमित पंघल यांनी देखील आपापल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत सुवर्णपदके भारताच्या झोळीत टाकली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
CWG 2022 | स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने पक्कं केलं पदक, फायनलमध्ये मिळवली जागा
खुद्द पंतप्रधानांनी ज्याचं कौतुक केलं, तो बीड जिल्ह्याचा अविनाश साबळे आहे तरी कोण?
त्याला काय फिरायला आणलंय? वेस्ट इंडिज दौऱ्यावर एका संधीसाठी तरसतोय ‘हा’ टॅलेंटेड भारतीय स्पिनर