अखिल भारतीय नागरी सेवा कबड्डी २०१९-२० स्पर्धांसाठी सेंट्रल सिविल सर्विसेस अँड स्पोर्ट्स बोर्डचा मुंबई डिव्हिजन संघ जाहीर करण्यात आला आहे. इनडोअर मैदान गव्हर्नरमेंट कॉलेज, कोटशेरा, चौरा मैदान, शिमला हिमाचल प्रदेश येथे या स्पर्धेचा आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक १५ नोव्हेंबर ते १९ नोव्हेंबर २०१९ दरम्यान ही स्पर्धा होईल.
रिजिनल स्पोर्ट्स बोर्ड, मुंबई कबड्डी संघ जाहीर करण्यात आला आहे. सेंट्रल सिविल सर्विसेस अँड स्पोर्ट्स बोर्ड मध्ये विविध खात्यात सेवेत असलेल्या मधून मुंबई संघाची निवड करण्यात आली आहे. इनकम टॅक्स मुंबई, सिजीएसटी मुंबई, इनकम टॅक्स पुणे, कस्टम्स अँड सेंट्रल एक्ससिस मुंबई अश्या चार विभागातून मुंबई संघ निवडला आहे.
या संघाच्या कर्णधारपदी निलेश साळुंके यांची निवड करण्यात आली आहे. १४ पैकी ८ खेळाडु प्रो कबड्डी खेळले आहेत. संघाच्या प्रशिक्षक (पदी सुभाष साहिल, तर व्यवस्थापकपदी उमेश लुथे यांची नियुक्ती केली आहे.
मुंबई संघ: विजय दिवेकर, मयूर खामकर, सुनील दुबिले, भाग्येश भिसे, गणेश जाधव, मयूर शिवतारकर, तुषार चव्हाण, निलेश साळुंके, मोबिन शेख, कृष्णा मदने, अजिंक्य कापरे, ऋतुराज कोवरी, सुशांत साहिल, आनंद पाटील.
प्रशिक्षक- सुभाष साहिल
व्यवस्थापक- उमेश लुथे