fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

दीपक चाहरने केला कहर! ७२ तासात घेतली दुसरी हॅट्रिक

भारतात सध्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी20 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत आज(12 नोव्हेंबर) राजस्थान विरुद्ध विदर्भ (Rajasthan v Vidarbha) संघात झालेल्या सामन्यात राजस्थानच्या दीपक चाहरने(Deepak Chahar)  हॅट्रीक घेत 4 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे त्याने चारही विकेट्स एकाच षटकात घेतल्या आहेत.

चाहरने या सामन्यात 3 षटके गोलंदाजी करताना 18 धावा देत 4 विकेट्स घेत राजस्थानच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. राजस्थानने अटीतटीच्या या सामन्यात व्हीजेडी मेथडच्या नियमानुसार 1 धावेने विजय मिळवला.

हा सामना पावसामुळे प्रत्येकी 13 षटकांचा करण्यात आला होता. राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 13 षटकात 8 बाद 105 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या विदर्भाला 13 षटकात 9 बाद 99 धावा करता आल्या. त्यामुळे व्हीजेडी मेथडनुसार राजस्थानने 1 धावेने विजय मिळवला.

अशी घेतली चाहरने हॅट्रिकसह एकाच षटकात 4 विकेट्स –

या सामन्यात चाहरने 12 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर विदर्भाच्या रिषभ राठोडला 3 धावांवर बाद केले. त्यानंतर चाहरने या षटकातील चौथ्या चेंडूवर दर्शन नळकांडेला(0) बाद केले. त्याच्या पुढच्याच दोन चेंडूंवर चाहरने अनुक्रमे श्रीकांत वाघ(13) आणि अक्षय वाडकरला(0) बाद केले आणि हॅट्रिक पूर्ण केली.

तीन दिवसापूर्वीच चाहरने घेतली होती आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक(hat-trick) –

रविवारी(10 नोव्हेंबर) बांगलादेश विरुद्ध भारताकडून(India vs Bangladesh) तिसरा टी20 सामना(3rd T20I) खेळताना चाहरने हॅट्रिक घेतली होती. या सामन्यात त्याने 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शफिउल इस्लामला बाद केले. त्यानंतर त्याने 20 व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर अनुक्रमे मुस्तफिजूर रेहमान आणि अल-अमिन हुसेनला बाद करत हॅट्रिक घेतली होती.

त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये हॅट्रिक घेणारा भारताचा पहिला पुरुष क्रिकेटपटू ठरला होता. तसेच त्याने या सामन्यात 3.2 षटके गोलंदाजी करताना केवळ 7 धावा देत या 6 विकेट घेतल्या.3.2 षटके गोलंदाजी करताना केवळ 7 धावा देत या 6 विकेट घेतल्या होत्या. त्यामुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वोत्तम गोलंदाजी प्रदर्शन करणाराही फलंदाज ठरला आहे.

You might also like