टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी निरज चोप्राने भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याने हे पदक जिंकून इतिहास रचला आहे. तब्बल 13 वर्षांनी ऑलिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. निराजच्या विजयामुळे देशभरात त्याचे कौतुक होत आहे. पंतप्रधानांसह इतर अनेक मोठ्या व्यक्तींनी त्याला या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
निराजचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खडतर राहिला आहे. प्रतिकूल परिस्थितीतून त्याने स्वत:ला या स्पर्धेसाठी तयार केले आहे. लेकाच्या घवघवीत यशानंतर निरजच्या वडिलांनी त्याच्या संघर्षाबद्दल माहिती दिली आहे.
निरज मुळचा हरियाणाच्या पानिपत जिल्ह्याचा रहिवासी आहे. त्याचे संपूर्ण कुटुंब ऑलिम्पिक स्पर्धा पाहत होते. जेव्हा नीरजने स्पर्धा जिंकली तेव्हापासून त्याच्या घरी लोकांची गर्दी होऊ लागली. सगळीकडे मिठाई वाटायला सुरुवात झाली. त्यादरम्यान निरजच्या वडिलांनी सांगितले सुविधांच्या आभावातून निरजने ही कामगिरी करून आपले नाव चमकवले आहे.
निराजचे वडील सतीश कुमार यांनी सांगितले की, “सुवर्णपदक जिंकल्यामुळे आम्हाला आमच्या मुलावर गर्व आहे. आमच्या गावात खेळाच्या सुविधांचा अभाव आहे. तो त्याच्या खेळासाठी घरापासून 15-16 किलोमीटर लांब जात असे.”
निरज ऑलिम्पिकच्या आधीपासून सुवर्णपदकाचा प्रमुख दावेदार मानला जात होता. संपूर्ण देशाची अपेक्षा होती की, निरज सुवर्णपदक जिंकेल आणि तो या अपेक्षांवर खरा उतरला आहे.
निरजविषयी थोडंसं
भारतीय लष्करात नायब सुभेदार असणाऱ्या निरजने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत 5 मेगा क्रीडा स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. त्याने आशियाई खेळ, राष्ट्रकुल खेळ, आशियाई चॅम्पियनशिप, दक्षिण आशियाई खेळ आणि जागतिक कनिष्ठ स्पर्धेत सुवर्ण पदके जिंकली आहेत. निरज चोप्राने आपले भालाफेक कौशल्य सुधारण्यासाठी जर्मनीच्या बायोमेकॅनिक्स तज्ञ क्लाऊस बार्टोनिट्झ यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
नीरजवर बक्षीसांचा वर्षाव! भारताच्या पहिल्या सुवर्णपदक विजेत्या ॲथलीटला आनंद महिंद्रांकडून ‘खास’ भेट
नीरजच्या सुवर्ण यशाचा उत्साह! “मेरे देश की धरती” गाण्यावर ७२ वर्षीय गावसकरांनी आनंदाने धरला ठेका
“माझे नाव पुन्हा जगासमोर आणण्यासाठी श्रीजेशचे आभार”