---Advertisement---

वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी नाही मिळाली संधी! केकेआरच्या स्टार फलंदाज नाराज

On: गुरूवार, जुलै 6, 2023 2:43 PM
Rinku Singh Ritish Rana
---Advertisement---

भारतीय संघाच्या वेस्ट इंडीज दौऱ्यात नितीश राणा याला संधी दिली गेली नाही. इंडियन प्रीमियर लीग 2023 मध्ये नितीश राणा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. कर्णधाराच्या रूपात त्याचे वैयक्तिक प्रदर्शनही चांगले होते. पण भारतीय संघाच्या निवडकर्त्यांकडून वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी त्याच्याकडे दुर्लक्ष झाले. संघात युवा खेळाडूंना संधी मिळाली, पण नितीशचे नाव यात नव्हते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने बुधवारी (6 जुलै) वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघाचे नेतृत्व पार्दिक पंड्या (Hardik Pandya) करणार असून रोहित शर्मा आणि विराट कोहली या वरिष्ठांना विश्रांती दिली गेली आहे. यशस्वी जयस्वाल आणि तिलक वर्मा यांना पहिल्यांदाच भारतीय संघाकडून बोलावणे आले आहे. पण नितीश राणा (Nitish Rana) याला युवा खेळाडूंनी भरलेल्या या संघातही जागा बनवता आली नाही. संघ घोषित झाल्यानंतर राणाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली नाराजी व्यक्त केली. आपल्या अधिकृत खात्यावरून राणाने सूर्य ग्रहणाचा फोटो शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाईट दिवसांमधूनच चांगले दिवस तयार होतात.”

नितीश राणाने भारतीय संघासाठी दोन टी-20 आंतरराष्ट्रीय आणि एक वनडे सामने खेळले आहेत. 2021 मध्ये श्रीलंका दौऱ्यासाठी त्याला निवडले गेले होते. पण या संघाचा फायदा त्याला घेता आला नाही. याच पार्श्वभूमीवर राणाला संघातून वगळण्यात आले. आयपीएळ 2023च्या 14 सामन्यांमध्ये राणाने 413 धावा केल्या. यात तीन अर्धशतकांचा समावेश होता. कोलकाता नाईट रायडर्ससाठी सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत राणाचा दुसरा क्रमांक होता. (Nitish Rana expresses displeasure over not getting a chance in Indian T20 squad for West Indies tour)

वेस्टइंडीज दौरे पर पांच टी20 इंटरनैशनल मैचों की सीरीज के लिए भारतीय टीम
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जायसवाल, ईशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.

महत्वाच्या बातम्या –
BREAKING: वर्ल्डकपआधी बांगलादेशला जबर धक्का! कर्णधार तमिम इक्बालची तडकाफडकी निवृत्ती
तिसऱ्या कसोटी आधीच कमिन्सने उडवला धुरळा! इंग्लंडला आव्हान देत म्हणाला, “आम्ही पुन्हा…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---