भारतीय क्रिकेट संघाने गेल्या काही वर्षांत आपली बेंच स्ट्रेंथ लक्षणीकरीत्या मजबूत केली आहे. भारताचे युवा खेळाडू देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहेत, ज्यामुळे टीम इंडियामध्ये तीव्र स्पर्धेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे जिथे टीम इंडियातील खेळाडूंवर संघात स्थान टिकवून ठेवण्यासाठी दबाव आहे, तर दुसरीकडे काही खेळाडू संघात येण्याची संधी शोधत आहेत. असाच एक खेळाडू म्हणजे नितीश राणा, ज्याने गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर भारताकडून पदार्पण केले होते, परंतु तेव्हापासून तो संघात स्थान मिळवू शकला नाही. २०२३मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात टीम इंडियात पुनरागमन करण्यावर आता राणाचे डोळे लागले आहेत.
नितीश राणा एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला की, “धावा करणे आणि माझा खेळ सुधारणे माझ्या हातात आहे. या हंगामात मी अधिक धावा करू शकेन अशी आशा आहे. जर मी आयपीएलच्या एका हंगामात ४०० धावा करूनही मला संधी मिळत नसेल, तर माझे काम ६०० धावा करणे आहे.”
आयपीेलमध्ये २०१६ पासून खेळत असलेल्या राणाने गेल्या ३ हंगामात ३५० हून अधिक धावा केल्या आहेत. त्याच्या बॅटने २०२२मध्ये ३६१, २०२१ मध्ये ३८३ आणि २०२० मध्ये ३५२ धावा केल्या होत्या. भारताच्या निवड समितीचे लक्ष वेधण्यासाठी डावखुरा हा पुढच्या सत्रात ५०० हून अधिक धावा करण्याचा विचार करत आहे.
पुढे बोलताना राणा म्हणाला की, “एक क्रिकेटपटू म्हणून मला नेहमीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्याची संधी हवी होती. मी (जुलै २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध) खेळलो त्या क्रमांकावर मला सोयीचे नव्हते. पण मला कोणतीही सबब द्यायची नाही. निवडकर्त्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मला येत्या आयपीएलमध्ये ५०० हून अधिक धावा करायच्या आहेत.”
दरम्यान, नितीश राणा भारतासाठी आत्तापर्यंत एकमेव एकदिवसीय सामना खेळला आहे ज्यात त्याने फक्त ७ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, दोन टी-२० सामन्यांमध्ये त्याच्या बॅटमधून केवळ १५ धावा आल्या. राणाची आयपीएल कारकीर्द चांगली आहे आणि त्याने ९१ सामन्यांत २८.३२च्या सरासरीने २१८१ धावा केल्या आहेत. यामध्ये १९ अर्धशतकांचा समावेश आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाटलाच्या लेकानं गाजवलीय कर्नाटकातील टी-२० लीग, शतक ठोकत आयपीेएल पदार्पण केलंय फिक्स
सॅम करनची तुफानी फटकेबाजी! विजयानंतर ‘ही’ गोष्ट बोलत जिंकली मने
डेल स्टेन म्हणावे की स्टंट मॅन? ‘हा’ व्हिडिओ पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न