मुंबई । मागील काही वर्षांत नितीश राणा हा एक प्रतिभाशाली खेळाडू म्हणून नावारुपास येत आहे. कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळताना काही स्फोटक खेळी करून संघाला विजय मिळवून दिले. डाव्या हाताने फलंदाजी करणार्या या खेळाडूने आपल्या आदर्श खेळाडूविषयी बालपणीच्या काही आठवणी एका संकेतस्थळाशी बोलताना सांगितल्या.
26 वर्षीय नितीश राणा लहानपणापासून सौरव गांगुलीचा फॅन आहे. नितीश गांगुली विषयी बोलताना म्हणाला, क्रिकेटचे सामने पाहत असताना सौरव गांगुली बाद झाला की, मला खूप राग यायचा. माझे वडीलही गांगुली विषयी बोलायचे. मी घरात जाऊन स्वतःला कोंडून घेत बराच वेळ रडत राहायचो. माझ्या घरातील सदस्यांना वेगवेगळे खेळाडू आवडायचे. माझा भाऊ राहुल द्रविडचा फॅन होता तर वडिलांना सचिन तेंडुलकर आवडायचे आणि मी सौरव गांगुलीचा चाहता होतो. यावरून घरात कधी वाद कधी कधी वादही व्हायचा.
राणाने 2016 साली मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएलमध्ये पदार्पण केले. आयपीएलमधल्या स्फोटक खेळीने तो चर्चेत येऊ लागला. त्यानंतर 2018 साली केकेआरच्या संघाने त्याला घेतले. केकेआरच्या संघाकडून खेळताना तो प्रत्येक सामन्यागणिक त्याची कामगिरी बहरत गेली. त्यामुळे त्याला भारत ‘अ’ संघात स्थान मिळाले.
नितीश राणाने आयपीएलमध्ये 46 सामन्यात 1 हजार 85 धावा केल्या आहेत. 85 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. यासोबत त्याने गोलंदाजीत 7 बळी देखील घेतले आहेत.
अक्षय कुमारला पाहायला जायचा
नितीश राणा आयपीएल विषयी बोलताना म्हणाला,“आयपीएलचे सामने पाहण्यासाठी मी कोटला स्टेडियमवर जायचो. कारण मला अभिनेता अक्षय कुमार आवडायचा. त्याला पहायला मिळेल या आशेने मी आयपीएलचे सामने पाहायला जायचो. तेव्हा तो दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या सोबत होता. पुढे मला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. मला स्वप्नात देखील वाटले नव्हते की मी आयपीएलमध्ये खेळले म्हणून.”





