देशांतर्गत क्रिकेटमधील दिल्ली संघाच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. कारण दिल्ली रणजी संघाचा माजी कर्णधार नितीश राणा आता संघाची साथ सोडणार आहे. राणा आयपीएल 2023मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करताना दिसला होता. आता तो दिल्ली संघासोबत आपला करार संपणास असल्यामुळे त्याने दिल्ली आणि जिल्ला क्रिकेट एसोसिएशनकडे नाहरकत प्रामाणपत्र देखील मागितले आहे.
नितीश राणा (Nitish Rana ) व्यतिरिक्त मागच्या वर्षी रणजी ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा ध्रुव शोरे हादेखील दिल्ली संघाची साथ सोडणार आहे. दिल्ली आणि जिल्ला क्रिकेट असोसिएशनचे संयुक्त सचिव राजन मनचंदा यांच्याकडून शुक्रवारी (11 ऑगस्ट) याविषयी सविस्तर माहिती मिळाली. यावेळी त्यांनी असे आश्वासन देखील दिले की, दोन्ही खेळाडूंसोबत चर्चा केली जाईल. दोघांच्या अडचणी सविस्तरपणे ऐकल्या जातील, जेणेकरून खेळाडूंनी असा निर्णय का घेतला, हे समजू शकेल. दरम्यान, माध्यमांमध्ये नितीश राणा संघाची साथ सोडण्यामागे काही प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
नितीश राणा का सोडणार दिल्ली रणजी संघाची साथ?
1. कर्णधारपद काढून घेतल्याने राणा निराश –
रणजी ट्रॉफीच्या मागच्या हंगाम सुरू असताना अचानक नितीश राणाकडून दिल्लीचे कर्णधारपद काढून घेतले गेल. यश धूल संघाचा नवा कर्णधार बनला. राणाचे प्रदर्शन या हंगामात सुमार दिसले होते. पण या एका कारणामुळे कर्णधारपदावरून काढणे त्याला पटले नाही, असे दिसते. सोबतच धूल दिल्ली संघासाठी फक्त एकच हंगाम खेळला असताना त्याला कर्णधारपद दिले गेले. याच कारणास्तव नितीश राणा चांगलाच निराश झाला होता.
2. संघातील खेळाडूंसोबत मतभेद –
नितीश राणा आणि दिल्ली संघातील काही खेळाडूंमध्ये मतभेत असल्याचेही बोलले जात आहे. इंडियन प्रीमियर लीग 2023 दरम्यान रितिक शौकीन आणि राणा लाईव्ह सामन्यात भिडले होते. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामन्यादरम्यान दिल्ली रणजी संघाचे हे दोन खेळाडू एकमेकांच्या अंगावर गेले होते. उपस्थित खेळाडूनी दोघांना थांबवल्यामुळे वाद वाढला नाही. रितिकने रणजी संघासाठीही यावेळी चांगले प्रदर्शन केले होते.
(Nitish Rana will quit the Delhi Ranji team)
महत्वाच्या बातम्या –
आयर्लंड दौऱ्यावर टीम इंडियाला मोकळीक! विना प्रशिक्षक खेळणार टी20 मालिका
WIvsIND । विराटचा ऐतिहासिक विक्रम मोडणारा ‘हा’ फलंदाज, टी-20 मालिकेनंतर यादीत होणार मोठा फेरबदल!