इंडियन प्रीमियर लीग २०२२ स्पर्धेचा (Ipl 2022) थरार सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी आयपीएल २०२२ स्पर्धेसाठीचा मेगा (Ipl mega auction) लिलाव सोहळा पार पडणार आहे. या ऑक्शनसाठी १२०० खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. दरम्यान या मेगा लिलावापूर्वी गतवर्षीच्या विजेत्या संघातील खेळाडू रवींद्र जडेजाचे (Ravindra Jadeja tweet) एक ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
भारतीय संघाचा आणि आयपीएल स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करणारा रवींद्र जडेजा सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. संघाबाहेर असला तरीदेखील तो सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत नेहमीच जोडलेला असतो. चेन्नई सुपर किंग्ज संघाने आगामी हंगामासाठी त्याला १६ कोटी रुपये खर्च करून रिटेन केले आहे. रवींद्र जडेजासह एमएस धोनी (Ms dhoni), मोईन अली (Moeen ali) आणि ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) देखील चेन्नई सुपर किंग्ज संघाने रिटेन केले आहे.
व्हिडिओ पाहा- काय घडलं होतं भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये
आयपीएल २०२२ मेगा लिलाव सोहळ्यापूर्वी सर्व संघ सोशल मीडियाद्वारे मॉक ऑक्शन घेताना दिसून येत आहेत. दरम्यान स्टार स्पोर्ट्स तमिळने देखील आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी चेन्नई सुपर किंग्ज संघ कसा असला पाहिजे? यासाठी पोल ठेवला होता. ज्यांमध्ये त्यांनी रिटेन केलेल्या खेळाडूंचे नाव आधीच लिहून ठेवले होते.
तर झाले असे की, स्टार स्पोर्ट्स तमिळच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्लेइंग ईलेव्हनचा फोटो शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये ऋतुराज गायकवाड पहिल्या स्थानी, मोईन अली तिसऱ्या स्थानी, एमएस धोनी सातव्या स्थानी आणि रवींद्र जडेजाला आठव्या स्थानी ठेवण्यात आले होते.
हे पाहून रवींद्र जडेजाने प्रतिसाद देत लिहिले की, “आठव्या क्रमांकावर खूप लवकर होऊन जाईल, मला ११ व्या क्रमांकावर ठेवा.” त्याचे हे ट्विट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
No 8 too early for me ! Put me @ 11🤣🤣
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) January 29, 2022
रवींद्र जडेजा हा चेन्नई सुपर किंग्ज संघातील मुख्य खेळाडू आहे. तो पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर येऊन तुफान फटकेबाजी करत असतो. त्याला आठव्या स्थानी ठेवल्यामुळे त्यानं त्याने हे ट्विट केले होते.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल मेगा लिलावात ‘या’ दमदार खेळाडूंना मिळणार नाही भाव; जाणून घ्या कारण
मेगा लिलावापूर्वी लखनऊ सुपरजायंट्सच्या रणनितीचा झाला खुलासा; वाचा सविस्तर
हे नक्की पाहा: