महिलांच्या बिग बॅश लीगमध्ये अॅडलेड स्ट्रायकर्सने थरारक सामन्यात होबार्ट हरिकेन्सवर सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवला. यामध्ये स्ट्रायकर्सकडून सोफी डिवाईनने एकूण ११५ धावा केल्या. मात्र तीचे शतक थोडक्यात हुकले आहे.
या सामन्यात सोफीने नाबाद ९९ आणि सुपर ओव्हरमध्ये नाबाद १६ धावा केल्याने तिच्या या सामन्यात एकूण ११५ धावा झाल्या. मात्र तिचे शतक करण्याचे स्वप्न अधुरेच राहिले.
हरिकेन्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला सोफीने फोल ठरवत ५३ चेंडूत नाबाद ९९ धावा केल्या. यामध्ये तिने ४ षटकार आणि १० चौकार मारले.
सोफीच्या या तुफानी खेळीने स्ट्रायकर्सने हरिकेन्सला १९० धावांचे लक्ष्य दिले होते. पण २० षटकात हरिकेन्सने १८९ धावाच केल्याने सामना बरोबरीत राहिला होता.
सुपर ओव्हरमध्ये हरिकेन्सने १३ धावांचे लक्ष्य दिले होते. यावेळी सोफीने तीन चेंडूमध्ये दोन षटकार आणि एक चौकार मारत संघाला विजय मिळवून दिला.
या लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये सोफी दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिने १० सामन्यात ४४९ धावा केल्या आहेत. मेलबर्न स्टार्स विरुद्धच्या सामन्यात तिने ९५ धावा आणि ५ विकेट्स घेत अष्टपैलू कामगिरी केली होती.
स्ट्रायकर्सने आतापर्यत ११ सामने खेळले असून त्यातील ३ सामन्यातच त्यांना विजय मिळवता आला आहे. यामुळे ते गुणतालिकेत तळाला आहेत.
या सामन्यात भारताच्या स्म्रीती मंधानानेही अफलातून फलंदाजी केली. हरिकेन्सकडून खेळताना तिने २०८च्या स्ट्राईक रेटने २५ चेंडूमध्ये ५२ धावा केल्या. यावेळी तिने ३ षटकार आणि ७ चौकारही मारले. मात्र तिच्या संघाला सुपर ओव्हरमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले.
Sophie Devine was the #WBBL04 @Dream11 MVP of the Day thanks to her 99 runs plus another 16 in the Super Over!
Make sure you pick teams for the next matches – awesome daily prizes up for grabs HERE! https://t.co/M49dikXVaJ pic.twitter.com/hTspw5qJ40
— Weber Women's Big Bash League (@WBBL) January 8, 2019
महत्त्वाच्या बातम्या-
– जगातील सर्वात फाॅर्ममध्ये असलेल्या क्रिकेटरने सचिन-कोहलीच्या विक्रमाला टाकले मागे
–स्मिथ- वार्नर संघात नव्हते ही काही आमची चूक नाही, माजी खेळाडू कडाडला
–विराट म्हणतो, तो जर आमच्या संघात असता तर त्याच्याशी असं नसतो वागलो